राठोड-गांधींमध्ये अखेर मनोमिलन

राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी आम्ही युतीधर्म पाळणार आहोत. मात्र, शिवसेनेने सन्मानाची वागणूक द्यावी, अशी भावना भाजप कार्यकर्त्यांनी मांडली. त्यावर राठोड यांनी युतीधर्म पाळताना सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणार असल्याची ग्वाही दिली.
Nagar Leaders Anil Rathod - Dilip Gandhi Came Togheter
Nagar Leaders Anil Rathod - Dilip Gandhi Came Togheter

नगर  : राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी आम्ही युतीधर्म पाळणार आहोत. मात्र, शिवसेनेने सन्मानाची वागणूक द्यावी, अशी भावना भाजप कार्यकर्त्यांनी मांडली. त्यावर राठोड यांनी युतीधर्म पाळताना सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणार असल्याची ग्वाही दिली.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी व शिवसेनेचे उमेदवार, माजी आमदार अनिल राठोड यांच्यात काही दिवसांपासून वितुष्ट आले होते. मात्र, काल सकाळी राठोड यांनी कार्यकर्त्यांसह भाजप कार्यालयात गांधी यांची भेट घेतली. किशोर डागवाले, हरिभाऊ डोळसे, शुभांगी साठे आदींनी "आम्हाला सन्मानाची वागणूक मिळावी,' अशी मागणी केली. त्यावर राठोड म्हणाले, "भाजप व शिवसेना असा दुजाभाव कधीच केला नाही. हाती घेतलेला भगवा अजून तसाच आहे. छोटा-मोठा असे कधीच पाहिले नाही. कारण भाऊ असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. शहरात सुवर्णकाळ आणायचा आहे. शहरातील गुंडगिरी थांबवायची आहे.''

गांधी म्हणाले, "थोडा उशीर झाला असला, तरी काही गोष्टी घडायला योग्य वेळ लागते. समज-गैरसमज दूर करण्याची ही वेळ आहे. भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह काल मुख्यमंत्र्यांचा फोन आला. व्यक्तिगत मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवून निवडणूक जिंकण्याचे ध्येय ठेवा, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शहर भाजपचे सर्व कार्यकर्ते आजपासून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करतील.''

दरम्यान, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे यांच्यासह भाजपचे नगरसेवक गैरहजर होते. मात्र, ते न्यायालयीन कामकाजासाठी औरंगाबादला गेल्याचे गांधी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com