मी कमी वयाचा अडवानी : कुमार विश्‍वास  - nagar kumar voshwas statement | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

मी कमी वयाचा अडवानी : कुमार विश्‍वास 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 जानेवारी 2018

नगर : महालात राहणारे आता "त्या' कुटीला विसरले असतील; पण मी विसरलो नाही. राळेगणसिद्धी माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. तुम्ही देशासाठी ज्या ज्या वेळी एकत्र याल, त्या त्या वेळी मी तेथे जाईन, असे प्रसिद्ध हिंदी कवी व आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्‍वास यांनी स्पष्ट केले. 

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सोनईच्या यशवंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित हिंदी कवी संमेलनात विश्‍वास बोलत होते. यशवंतराव गडाख, कवी सुदीप भोला व दिनेश बावरा, बद्रिनाथ तनपुरे महाराज, डॉ. सुभाष देवढे, युवा नेते प्रशांत गडाख, संजीव तनपुरे आदी उपस्थित होते. या संमेलनात कवींनी सादर केलेल्या राजकीय वात्रटिकांना रसिकांनी हशा, टाळ्या व शिट्यांनी मनमुराद दाद दिली. सुरवातीला ज्येष्ठ नेते गडाख यांच्या जीवनावरील फोटोबायोग्राफीचे प्रकाशन विश्‍वास यांच्या हस्ते झाले. गडाख यांच्याच "मेंटली अनफिट' या कवितेचा हिंदी अनुवाद सादर करण्यात आला. 

विश्‍वास म्हणाले, "हिंदी माझी मातृभाषा असली, तरी मराठी माझी मावशी आहे. राजकारण चपलेसारखे असते आणि साहित्य पगडीसारखे असते. समोरच्याने पगडीला हात घातल्यावर चप्पलच हातात घ्यावी लागते. नगर जिल्ह्यात अण्णा हजारे आहेत. सर्वाधिक साखर व दुधाचे उत्पादन आहे; पण चहावाला पंतप्रधान नाही. मी भारतीय राजकारणातील सर्वांत कमी वयाचा अडवानी आहे.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख