केडगाव हत्याकांड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४२ कार्यकर्ते पोलिसांना शरण

केडगाव हत्याकांडानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाची मोडतोड केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४२ कार्यकर्ते आज पोलिसांना शरण आले. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
केडगाव हत्याकांड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४२ कार्यकर्ते पोलिसांना शरण

नगरः केडगाव हत्याकांडानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाची मोडतोड केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४२ कार्यकर्ते आज पोलिसांना शरण आले. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

केडगाव येथे सात एप्रिल रोजी शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या वेळी पोलिसांनी संशयावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले होते. गुन्हा दाखल नसताना का ताब्यात घेतले. या कारणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जावून तेथे कार्यालयाची मोडतोड केली. तसेच आमदार जगताप यांना पोलिसांच्या ताब्यातून हिसकावून घेवून पळवून नेले.

जगताप यांचे सासरे व भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हेही या वेळी उपस्थित होते. त्यामुळे आमदार कर्डिले यांच्यासह सुमारे पाचशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी काही कार्यकर्त्यांना तत्काळ अटक करण्यात आली.

आमदार कर्डिले यांनाही अटक करून नंतर त्यांची जामीनावर त्यांची सुटका झाली. उर्वरित कार्यकर्ते फरार होते. त्यापैकी ४२ कार्यकर्ते आज भिंगार पोलिस ठाण्यात दाखल झाले.

पोलिसांनी त्यांना अटक करून घेवून दुपारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामध्ये नगरसेवक अरिफ शेख, निखील वारे, कुमार वाकळे, सुरेश मेहतानी, सुहास शिरसाठ, अरविंद शिंदे, सत्यजीत ढवण, कुलदीप भिंगारदिवे, चंद्रकांत औशिकर, दत्ता तापकिरे, बाबासाहेब गाडळकर, दिलबरसिंग वीर आदींचाही समावेश आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com