Nagar Girl Commits Suicide for Maratha Reservation | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी तिने दिला स्वतःचा बळी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

कापूरवाडी (ता. नगर) येथील ही मुलगी शेतकरी कुटुंबातील आहे. तिने तीन महिन्यांपूर्वी अकरावी सायन्स शाखेत प्रवेश घेतला. अनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला नसल्याने तिने विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घेवून फी भरली. काल ती क्लास अर्धवट सोडून हाॅस्टेलच्या रुममध्ये गेली. तिथे नायलाॅन दोरीच्या साह्याने तिने गळफास घेवून आत्महत्या केली.

नगर : 'मला दहावीत ८९ टक्के गुण मिळाले, तरीही अनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला नाही. ८ हजार भरावे लागले. याउलट ७६ टक्के गुण असलेल्या व आरक्षण असलेल्या मुलीने केवळ एक हजार भरले. केवळ मराठा समाजात जन्माला आले म्हणून ही वेळ. त्यामुळेच आरक्षणासाठी मी बलीदान देत आहे,' असे चिठ्ठीत लिहून नगरच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थीनी किशोरी बबन काकडे (वय १७) हिने गळफास घेवून आत्महत्या केली.

कापूरवाडी (ता. नगर) येथील ही मुलगी शेतकरी कुटुंबातील आहे. तिने तीन महिन्यांपूर्वी अकरावी सायन्स शाखेत प्रवेश घेतला. अनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला नसल्याने तिने विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घेवून फी भरली. काल ती क्लास अर्धवट सोडून हाॅस्टेलच्या रुममध्ये गेली. तिथे नायलाॅन दोरीच्या साह्याने तिने गळफास घेवून आत्महत्या केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख