जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेली कामे प्रशंसनीय : प्रा.  राम शिंदे

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेली कामे प्रशंसनीय : प्रा.  राम शिंदे

नगर :  जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेली कामे प्रशंसनीय  आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे वाटचाल आता टंचाईमुक्तीच्या दिशेने होत आहे.कृषी योजनांची कामेही जिल्ह्यात चांगली झाली आहेत. या कामांना अधिक गती देण्यासाठी लोकसहभाग अधिक हवा आहे, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

प्रजासत्ताकदिनाचा मुख्य कार्यक्रम पोलिस परेड मैदानावर झाला. प्रा. शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी त्यांनी विविध योजनांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील झालेल्या कामांचा आढावा घेतला. या वेळी महापाैर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा तसेच विविध खात्यांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी शिंदे म्हणाले, की मागील तीन वर्षांत जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण व मृदसंधारणची कामे झाली. लोकसभहभागातून झालेल्या कामांची प्रभावी अंमलबवाजणी झाल्यामुळे जिल्ह्यात पाण्याची उपलब्धताही वाढली. पहिल्या वर्षी २७९ गावांमध्ये ५९ हजार ३३३ टीसीएम इतका पाणीसाठा विकेंद्रीत स्वरुपात निर्माण झाला. 

या वर्षीही २४१ गावांची निवड करण्यात येऊन त्यासाठी १८५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. उत्कृष्ट कामांमुळे जिल्ह्याचा गाैरवही झाला आहे. येत्या काही काळात जिल्हा पूर्णपणे टॅंकरमुक्त करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सहा हजार ६६७ शेततळी झाली आहेत.या माध्यमातून मत्सपालनासारखे पुरक व्यवसाहयी वाढीस लागले आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून विविध अनुदानातून शेतीआैजारे देण्यात आली आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ८४ हजार ३९ शेतकऱ्यांना ५२३ कोटी ८० लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाला.

 आजपासून राज्यभर लोकशाही पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या प्रक्रीयेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. शिंदे यांनी या वेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com