अनिल राठोड यांनी स्वतः बनविलीय खीर.....लाॅकडाऊन असल्याने स्वतःच संपवणार?

शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांनी आज सकाळी स्वतःच्या हाताने मस्त खीर बनवली. थोडी ऊतू गेली, बरीचशी शिल्लक आहे. आता सर्वांना खायला बोलावले असते, पण घराच्या बाहेर पडायचं नाही. म्हणून तेच संपविणार आहेत
Nagar EX MLA Anil Rathod Prepared Kheer
Nagar EX MLA Anil Rathod Prepared Kheer

नगर : शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांनी आज सकाळी स्वतःच्या हाताने मस्त खीर बनवली. थोडी ऊतू गेली, बरीचशी शिल्लक आहे. आता सर्वांना खायला बोलावले असते, पण घराच्या बाहेर पडायचं नाही. म्हणून तेच संपविणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वजण घरात आहेत. अनेकांनी 'वर्क फ्राॅम होम' सुरू केले आहे. सर्वसामान्यांचे ठीक आहे. पण राजकीय नेते रोजच व्यग्र असतात. रोज कुठे ना कुठे उदघाटने, आंदोलने, कार्यकर्त्यांशी संवाद, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात त्यांचा दिवस जातो. रोजच घराबाहेर पडताना त्यांना किचनमध्ये काय असते, काय नसते, याची चौकशी करण्याचे कारण नसते. कारण प्रत्येकाच्या 'होम मिनिस्टर' हे सर्व पाहतात. गेल्या आठ-दहा दिवसांपासून मात्र पुरुषांनीही महिलांच्या किचनमध्ये डोके घालायचे काम सुरू केले आहे. अनेकजण भजी तळतात, कुणी चिप्स तळून खात आहेत. सिनेअभिनेत्यांचे तर भांडी घासतानाचेही फोटो व्हायरल झाले आहेत. 

या सर्वच पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल राठोड आज सकाळी स्वतःच्या हाताने खीर बनविली. पप्पा किचनमध्ये काहीतरी खुटपूट करीत असल्याचे त्यांचे चिरंजीव विक्रम यांच्या  लक्षात आले. त्यांनी सहज म्हणून डोकावले, तर पप्पा किचनमध्ये काहीतरी बनवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते खीर बनवित असल्याचे पाहून विक्रम यांनी त्यांचे काही छायाचित्र घेतले.
घरात राहून राठोड रोज देवपूजा उरकून कार्यकर्त्यांशी फोनवर चर्चा करतात. शहरात कुठे कमी-जास्त याची चौकशी करतात. अधिकाऱ्यांशी बोलून तशा सूचना मांडतात. टिव्ही पाहणे, पुस्तक वाचन हा त्यांचा दिनक्रम असतो. आज मात्र त्यांनी किचनमध्येच जावून कुठे काय ठेवले याचा अंदाज घेतला आणि स्वतःच्या हाताने खीर बनविली.

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू, क्रेझ कायम

अनिल राठोड यांनी यापूर्वी मंत्रीपद भूषविले आहे. शहराचे तब्बल 25 वर्षे आमदारपद भूषविले आहे. शिवसेनेशी पूर्वीपासून एकनिष्ठ असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. तरुणपणी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी इतर पक्षाकडे जाण्याचा विचार केला नाही. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले असते, तर पुन्हा त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली असती. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ते विश्वासू मानले जात होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राठोड यांचे संबंधही घनिष्ठ आहेत. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून त्यांची आजही ओळख आहे. गेल्या सहा वर्षांपासून आमदार नसले, तरीही राठोड यांच्याकडे नागरिकांची रेलचेल चालूच असते. वयाची सत्तरी ओलांडली, तरीही राठोड तितक्याच उमेदीने सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरतात. त्यामुळेच नगरच्या शिवसेनेची मूठ अद्यापही त्यांच्याच हातात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com