सिनेअभिनेत्री उर्वशी रौतेला यांना बोलावून अभिषेक कळमकरांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

नगरमध्ये दहीहंडी महोत्सव उत्साहाने साजरा होतो. विशेषतः राजकीय मंडळी गर्दी खेचून आणण्यासाठी या उत्सवाचा उपयोग आवर्जून करतात. गर्दी खेचून आणण्यासाठी अभिनेत्रीला बोलण्याची जणू प्रथाच पडली आहे. त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी चौकाचौकात मंडळे सक्रिय होऊन उत्सवामध्ये सहभाग घेतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अभिषेक कळमकर यांनी स्थापन केलेल्या श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीने झोपडी कॅन्टीनजवळ जोरदारपणे शक्तिप्रदर्शन करण्यात आले
सिनेअभिनेत्री उर्वशी रौतेला यांना बोलावून अभिषेक कळमकरांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

नगर : नगर विधानसभा मतदारसंघासाठी आगामी काळात कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार असेल, याबाबत अद्यापही साशंकता आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप भाजपमध्ये जातील, अशी शक्यता वारंवार बोलली जात असल्याने याच पक्षातील दुसरे नेते माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी जनसंपर्काला जोर लावला आहे. त्याचाच भाग म्हणून दहीहंडी रेकॉर्ड ब्रेक करून कळमकर यांनी आपणही लढण्यासाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे. त्यासाठीच सिनेअभिनेत्री उर्वशी रौतेला हिला बोलावून गर्दी खेचून आणण्यात कळमकर यशस्वी ठरले आहेत.

नगरमध्ये दहीहंडी महोत्सव उत्साहाने साजरा होतो. विशेषतः राजकीय मंडळी गर्दी खेचून आणण्यासाठी या उत्सवाचा उपयोग आवर्जून करतात. गर्दी खेचून आणण्यासाठी अभिनेत्रीला बोलण्याची जणू प्रथाच पडली आहे. त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी चौकाचौकात मंडळे सक्रिय होऊन उत्सवामध्ये सहभाग घेतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अभिषेक कळमकर यांनी स्थापन केलेल्या श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीने झोपडी कॅन्टीनजवळ जोरदारपणे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सिनेअभिनेत्री उर्वशी रौतेला हिला बोलून युवकांची गर्दी खेचण्यात ते यशस्वी झाले. समोर मनसोक्त नाचण्यात दंग झालेल्या युवकांनी कळमकर यांच्या नावाचा जयघोष करताना भावी आमदार असाच उल्लेख केला. यावरूनच कळमकर यांच्यासह युवकांच्या मनात काय आहे, हे सहज समजून गेले.

कळमकर यांनी महापौर असताना मुख्यमंत्र्यांकडून मिळालेला 40 कोटीचा निधी शहरातील विविध विकास कामांसाठी वापरला. त्यावेळी अनेक कामीमे होऊ शकली. अंतर्गत गटारी, रस्ते, बगीच्या आदी कामांना मोठा दिलासा मिळाला होता. हे करत असताना शहरात पक्षसंघटन वाढवण्यासाठी त्यांनी कायमच पुढाकार घेतला. कळमकर सध्या रयत शिक्षण समितीचे जनरल बॉडी सदस्य आहेत. त्या माध्यमातूनही त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्याचेच फलित म्हणून युवक आपल्या बाजूने खेचून ठेवण्यात त्यांना चांगले यश मिळाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास ते जगताप यांचे काम करतील, मात्र, जगताप हेच भाजपमध्ये जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातुन वर्तविली जात असल्याने कळमकर त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता नाही. तर स्वतंत्रपणे आपले अस्तित्व दाखवत विधानसभेसाठी पुढे येऊ शकतात, त्यामुळेच आज सोबत फिरत असलेल्या आमदार जगताप यांच्या विरोधात कळमकर हे उमेदवार दिसू लागल्यास आश्चर्य वाटायला नको.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com