महाविद्यालयीन युवक-युवती बनले विविध खात्यांचे पदाधिकारी

समाजात घेतल्या जाणाऱ्या निवडणुका, सामाजिक कामांत पदाधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धती, सामाजिक प्रश्न सोडविताना विभागानुसार संबंधित खात्याचे मंत्री झाल्याचा अनुभव सध्या 'यिन'चे सदस्य घेत आहेत. आगामी काळातील निवडणुकांची जणू ही मंडळी रंगीत तालीमच करीत आहेत. नव्याने खातेवाटप झालेले युवक आता जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्याच्या कामाला लागले आहेत.
महाविद्यालयीन युवक-युवती बनले विविध खात्यांचे पदाधिकारी

नगर : समाजात घेतल्या जाणाऱ्या निवडणुका, सामाजिक कामांत पदाधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धती, सामाजिक प्रश्न सोडविताना विभागानुसार संबंधित खात्याचे मंत्री झाल्याचा अनुभव सध्या 'यिन'चे सदस्य घेत आहेत. आगामी काळातील निवडणुकांची जणू ही मंडळी रंगीत तालीमच करीत आहेत. नव्याने खातेवाटप झालेले युवक आता जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्याच्या कामाला लागले आहेत.

सकाळ माध्यम समुहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) महामंडळाची नगर जिल्ह्यात स्थापना करण्यात आली. यानिमित्ताने जिल्ह्यात सामाजिक जागर करण्यास युवा वर्ग सज्ज झाला आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी अजिंक्य दंडवते यांची निवड झाली. दंडवते यांच्यासह १४ सदस्य महामंडळात विविध खाती सांभाळणार आहेत. यानिमित्ताने मंत्री होण्याचा वेगळा अनुभव हे युवक घेत असून, सामाजिक कार्यक्रमाची आखणी त्यांनी सुरू केली आहे.

तरुणांच्या नेतृत्त्वगुणांना वाव मिळावा, यासाठी सकाळ माध्यम समुहाने यिन ची स्थापना केली. त्याअंतर्गत तयार केलेल्या महामंडळाद्वारे युवकांना प्रोत्साहन देण्याचे नियोजन करण्यात आले. यिन महामंडळाचे विविध खाते तयार करण्यात आले आहे. संबंधित खात्याच्या माध्यमातून हे युवक-युवती सामाजिक उपक्रम राबविण्यास सज्ज झाले आहेत.

यिनचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण कोल्हे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष योगेश्वरी उंडे, जिल्हा समन्वयक सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे महामंडळ काम करणार आहे.

सदस्य व खातेवाटप पुढीलप्रमाणे : अपेक्षा डोके (ग्रामविकास खाते), महेश विखे (स्वच्छ भारत अभियान), शुभम काळे (सर्व शिक्षा अभियान), मंगेश डोके (क्रीडा व युवक कल्याण), शिवानी संगमनेरकर (पर्यावरण विकास), स्नेहल आहेर (महिला विकास), संकेत शिरसाठ (जलसंपदा), कृष्णा मुळे (आरोग्य), जगदीश पवार (सार्वजनिक वाहतूक), श्रेयस पुंड (कौशल्य विकास), सागर कुळधरण (सांस्कृतिक), प्राची कुसळे (व्यसनमुक्ती), हर्शल थेटे (कृषी), अचल वाडते (समाजकल्याण). खातेवाटप झाल्याने संबंधित युवक यिन सदस्यांना संबंधित विषयांतल्या उपक्रमांना प्रोत्साहन देणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com