नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकृत नगरसेवकांची वाट अडवली!

nagar corporator nominations rejected
nagar corporator nominations rejected

नगर: महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकपदासाठी दाखल केलेली पाचही नामनिर्देशनपत्रे आज झालेल्या महासभेत अपात्र ठरली. धर्मादाय आयुक्त कार्यालयात सामाजिक संस्था म्हणून नोंद असलेल्या संस्थेचा सदस्य व त्या संस्थेत पाच वर्षे काम केल्याचा पुरावा सादर न केल्याने सारेच अर्ज अपात्र ठरविण्याची शिफारस जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी केली. त्यानुसार महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सारेच अर्ज अपात्र ठरविले.

स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी पुन्हा महिनाभरात प्रक्रिया होणार असल्याचे महापौर वाकळे यांनी जाहीर केले. स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेना व राष्ट्रवादीकडून प्रत्येकी दोन, तर भाजपकडून एक नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. त्यानुसार काल सायंकाळी तिनही पक्षाच्या गटनेत्यांनी स्वीकृत नगरसेवकांची नामनिर्देशनपत्रे बंद लिफाफ्यात महापालिकेचे नगरसचिव एस. बी. तडवी यांच्याकडे सादर केली होती. त्यात शिवसेनेकडून संग्राम शेळके व मदन आढाव, राष्ट्रवादीकडून बाबासाहेब गाडळकर व विपूल शेटिया, तर भाजपकडून रामदास आंधळे यांचे अर्ज सादर करण्यात आले होते. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी या अर्जांची छाननी करून सर्व अर्ज अपूर्ण असल्याचा अहवाल दिला होता. त्यामध्ये पाचही अर्ज कागदपत्रांच्या त्रुटीमुळे नाकारण्याची शिफारस केली होती. 
 
स्वीकृत नगरसेवकपदासाठी सुचविलेल्या नावावरून भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उघड झाली. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे नाराजी मांडल्याचे समजते. शिवसेनेतही तीच स्थिती होती. त्यामुळे सायंकाळपर्यंत याबाबत गोंधळाचे वातावरण होते.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com