nagar-corporation-election-gulabrao-patil-anil-rathod | Sarkarnama

नगर महापालिका निवडणूक : गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत अनिल राठोड करणार शक्तीपदर्शन

मुरलीधर कराळे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

नगर : अवघ्या चार महिन्यांवर आलेल्या महापालिकेची निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून जोरदार सुरू आहे. प्रभाग रचना, मतदार याद्या याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या, त्यामुळे आता राजकीय पक्षही जोरदार कामाला लागले आहे. त्यात शिवसेनेने फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. इतर पक्षातील एक-एक नगरसेवक फोडून गळाला लावून सर्वच जागा जिंकण्याचे मनसुबे शिवसेनेने रचले आहेत. 

महापालिकेवर पुन्हा भगवा भडकावयचाच असा चंग उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांनी बांधला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच एक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन शिवसेनेने केले आहे.

थोड्या नव्हे, हव्यात सर्वच जागा
शिवसेनेला थोड्या नको, सर्वच जागा हव्या आहेत. महापालिकेवर एकहाती सत्ता हवी आहे, अशी डरकाळी नुकतेच राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना फोडली होती. तसेच नगरमध्ये भाजप–राष्ट्रवादी व काॅंग्रेस यांची मिलीभगत आहे. त्यामुळे तिनही पक्ष शहरात फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. याचाच फायदा घेत एक-एक प्रभागातील प्रमुख नेते शिवसेनेत घेण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले आहेत.

केडगाव हत्याकांडाचा परिणाम
केडगाव दुहेरी हत्याकांडात शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची हत्या झाली. त्याचा परिणाम राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्हीही पक्षांना झाला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते गुंडप्रवृत्तीचे आहेत, असा सूर आळविण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता, तथापि, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही निर्दोष असल्याचे सिद्ध करीत या प्रकरणापासून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा गाजणार आहे. 

शिवसेना या मुद्दयाचे किती भांडवल करणार, हे गुलाबराव पाटील यांच्या सभेच्या वेळीही स्पष्ट होणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख