nagar congress | Sarkarnama

विधानसभेतून निलंबन त्यांच्यासाठी इष्टापत्ती

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 मार्च 2017

नगर ः श्रीगोंदे विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल जगताप व नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गोंधळ घातला. त्यांना निलंबित करण्यात आले मात्र ते या भागाचे हिरो ठरले. इतर क्षेत्रात निलंबन ही आपत्ती असली, तरी आमदारांच्या बाबतीत ही इष्टापत्ती ठरली. निलंबन होताच सोशल मीडियावर आमदारांच्या अभिनंदनाच्या पोस्ट धडाधड पडू लागल्या. 

दोन्ही आमदारांचे निलंबन होताच, जिल्ह्यात त्यांचे समर्थन करीत कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन हे चर्चेचे ठरले. सध्या मार्चअखेरीमुळे सोसायट्यांचे कर्ज भरण्याच्या लगबगीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांचे मसिहा म्हणून दोन्ही आमदारांकडे पाहिले जात आहे. दोन्ही तरुण आमदारांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी तीव्र आंदोलन छेडण्याच्या मानसिकतेत नसतील, तर नवलच. 

दोन्ही आमदारांच्या सध्याच्या लोकप्रियतेमुळे आता इतर आमदारांनाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव होऊ लागली आहे. भाजप सत्ताधारी असल्याने ते बोलत नाहीत, परंतु राष्ट्रवादी व काग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सध्या ऐरणीवर आणला आहे. साहजिकच त्याचा परिणाम बॅंकांची शेतकऱ्यांकडून येणारी वसुली, सोसायट्यांचे कर्ज नवं-जुनं करण्याच्या प्रक्रियेवर होत आहे. कर्जे माफ होणार, या आशेने शेतकरी कोणत्याही प्रकारचे कर्ज भरत नाही, किंवा व्याजही भरण्यासाठी पुढे येत नाहीत, अशी स्थिती आहे. वसुली अधिकारीही शेतकऱ्यांच्या कर्जवसुली करण्यासाठी पुढे येत नाहीत. एकूणच दोन्ही आमदार सध्या जिल्ह्यात हिरो ठरले आहेत. त्यांनी कोणतेही आंदोलन पुकारले, तरी शेतकरी त्यांच्या पाठिशी खंबीर उभे राहतील, यात शंकाच नाही. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख