नगर ः पशुधन जगविण्यासाठी सरकारने चाराछावण्या सुरू केल्या. मात्र, या छावण्यांत बेशिस्तीचा कारभार होत असल्याचे छावण्यांच्या तपासणी अहवालानुसार समोर आले. त्यावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कर्जत तालुक्यातील 12 छावण्यांना, एक कोटी 23 लाखांचा दंड का ठोठावण्यात येऊ नये, अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा बजावल्या. छावणीचालकांना त्यावर 48 तासांत खुलासा करायचा आहे. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे.
जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जिल्ह्यात 511 चाराछावण्या मंजूर केल्या. जूनपर्यंत यांपैकी 504 चाराछावण्या सुरू होत्या. त्यात दाखल असलेल्या पशुधनाची संख्या साडेतीन लाखांच्या घरात पोचली होती. दरम्यान, जूनपासून मागील दोन महिन्यांच्या अवधीत जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे चाराछावण्यांची संख्या घटली. आजमितीला जिल्ह्यात 111 चाराछावण्या सुरू असून, त्यात दाखल असलेल्या पशुधनाची संख्या 62 हजार 230 आहे.
रजिस्टर अद्ययावत नसणे, चारावाटप न करणे, जनावरांच्या कानाला बिल्ले न लावणे आदी त्रुटींसाठी दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
...
नोटिस काढलेल्या छावण्या व विचाराधीन दंड
बाभूळगाव खालसा 3,33,070
नागलवाडी 74,200
हंडाळवाडी 2,33,010
आंबीजळगाव 2,17,920
मुळेवाडी 6,75,120
पाटेगाव 6,43,600
कानगुडेवाडी 6,27,000
डोंबाळवाडी 6,63,875
नागापूर 3,35,410
येसवडी 26,62,040
चखालेवाडी 33,25,645
खुरंगेवाडी 33,42,100
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.