नगरमध्ये वीजबिल वसुलीविरोधात भाजप नेते आक्रमक

nagar bjp started agitation against light bill recovery
nagar bjp started agitation against light bill recovery

नगर ः सध्या जिल्ह्यात "कोरोना'मुळे घबराट पसरली आहे. अशा वेळी थकीत वीजबिलासाठी महावितरणने जुलमी वसुली सुरू केली आहे. ही वसुली बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिला आहे.

भाजपच्या जिल्हा शाखेतर्फे आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देण्यात आले. आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे (दक्षिण) व राजेंद्र गोंदकर (उत्तर), शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, विक्रमसिंह पाचपुते, ऍड. विवेक नाईक आदी उपस्थित होते.

हा जुलमी तगादा
सध्या कोरोना विषाणुमुळे शहरीभागाबरोबरच ग्रामीण भागातील जनताही घाबरलेली आहे. शेतीमालाला भाव मिळत ऩसल्याने ग्रामस्थ आर्थिक संकटात आहेत. शहरातील बहुतेक व्यवहार बंद झाल्याने पैसा उपलब्ध होत नाही. बहुतेक बॅंकांनी वसुल्याही थांबविल्या आहेत. 

महावितरणने शेतकऱ्यांकडे वीजबिलांच्या वसुलीसाठी सुरू केलेला जुलमी तगादा अन्यायकारक आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना नियमित वीज मिळत नाही. नवीन रोहित्र बसवून मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. आधीच आर्थिक अडचणीत असणारा शेतकरी धास्तावला आहे. महावितरणने हा अन्याय न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा नेत्यांनी दिला.

स्नेहलता कोल्हे सरसावल्या
दरम्यान, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वीजप्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, की वीजवितरणने सुरू केलेली वसुली अन्यायकारक आहे. सध्या कोणाच्याही वसुल्या सुरु नाहीत. लोकांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत विजवितरणचे लोक येऊन शेतकऱ्यांना भांडावून साडवत आहेत. त्या विरोधात आवाज उठवू, असे सांगून त्या आक्रमक झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com