भाजपच्या नगर जिल्हाध्यक्षपदी गंधे, मुंढे व गोंदकर

भाजपच्या नगर जिल्हाध्यक्षपदी गंधे, मुंढे व गोंदकर

नगर : दिग्गजांचा प्रवेश होऊनही विधानसभेत मोठ्या अपयशानंतर भाजपने जिल्हाध्यक्ष बदलताना नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. शहर जिल्हाध्यक्षपदी भैय्या गंधे, उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गोंदकर, तर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अरुण मुंढे यांची नियुक्ती केली आहे. 

नगरमध्ये झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या सदस्यांमध्ये एकमत न झाल्याने अखेर ही निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
नगरमध्ये नुकतीच या पदांसाठी 39 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. याबाबत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकित चर्चा झाली. या बैठकिला माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रा. राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले आदी उपस्थित होते. 

 निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हरिभाऊ बागडे यांनी काम पाहिले होते. या निवडणुकीत माजी जिल्हाध्यक्षसुद्धा रिंगणात उभे होते. नगर शहरासाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष व इतर ग्रामीण भागासाठी दोन जिल्हाध्यक्ष देण्याचे नियोजन झाले.

 अर्ज जास्त आल्याने सर्वांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र या वेळी कोणाच्याही नावावर स्थानिक नेत्यांमध्ये एकमत होत नव्हते. अखेर हा निवडीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात गेला. आज बागडे यांनी संबंधितांना पत्राद्वारे कळवून ही निवड जाहीर केली.

अखेर एकमत नाहीच
जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल, याबाबत जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली होती. सध्या विखे पाटील व विधानसभेत पराभूत झालेले उमेदवार प्रा. ऱाम शिंदे, शिवाजीराव कर्डिले यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. पराभूत उमेदवारांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे विखे पाटील यांच्याविरोधात तक्रार देऊन जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

 या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष कोण असेल यापेक्षा तो कोणाच्या गटाचा असेल, याकडे कार्य़कर्त्यांचे लक्ष लागले होते. आजच्या या निवडीमुळे तिनही जिल्हाध्यक्ष म्हणून तरुण चेहऱ्यांना संधी दिली असल्याने दिग्गजांना सोबत घेऊन हे पक्षसंघटना कशी बांधणार, याकडे आता धुरिणांचे लक्ष लागले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com