पोलिसही भिडे गुरुजींचे धारकरी : आमदार जितेंद्र आव्हाड

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्याविरोधात ऍड. गजेंद्र दांगट यांनी मोर्चा काढला होता. ऍड. दांगट हे पुरोगामी सैनिक आहेत. त्यांच्यावरील खुनी हल्ला घृणास्पद आहे. हे संपूर्ण प्रकरण पाहता, पोलिसांची भूमिका भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांचीच असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज केला.
पोलिसही भिडे गुरुजींचे धारकरी : आमदार जितेंद्र आव्हाड

नगर : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्याविरोधात ऍड. गजेंद्र दांगट यांनी मोर्चा काढला होता. ऍड. दांगट हे पुरोगामी सैनिक आहेत. त्यांच्यावरील खुनी हल्ला घृणास्पद आहे. हे संपूर्ण प्रकरण पाहता, पोलिसांची भूमिका भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांचीच असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज केला.

ऍड. दांगट व शिवसेनेचे माजी नगरसेवक दत्तात्रेय मुदगल यांच्या गटात काल (शनिवारी) रात्री मारामाऱ्या झाल्या. त्यात ऍड. दांगट गंभीर जखमी झाले असून, आव्हाड यांनी आज दुपारी येथील खासगी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर रुग्णालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "कोणीही उठावे, जातीयवादी शिव्या द्याव्यात, विरोधकांवर वार करावेत आणि पोलिस संरक्षण देणार नसतील, तर महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो. छिंदम व मुदगल यांच्यातील व्यावहारिक संबंध संपूर्ण नगर शहराला माहीत आहेत. छिंदमच्या विरोधात दांगट यांनी मोर्चा काढला. त्यास अटक करण्याची मागणी केली. त्या वेळी मुदगलने सांगितले होते, की "छिंदमचा विषय सोडून दे, आमचे आर्थिक व्यवहार अडकतील.' मुदगल याच्या व्यवहारासाठी कार्यकर्त्यांनी पुरोगामित्वाची लढाई लढायची नाही का?''

भिडे गुरुजी यांच्याप्रमाणेच त्यांच्या समर्थकांचेही वर्तन असल्याचे सांगून आव्हाड म्हणाले, "गुरुजींना विरोध केल्यास मारून टाकू, ही सर्वदूर पसरलेली त्यांच्या समर्थकांची भावना आहे. त्यातून हा हल्ला झाला आहे. पोलिस अशा आरोपींना संरक्षण देणार असतील, तर कायद्याचे राज्यच संपले, असे म्हणावे लागले. याबाबत विधानसभेत आवाज उठवावा लागेल.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com