राधाकृष्ण विखेंचा नगर पोलिसांवर दबाव; कोतकर-ठुबे कुटुंबियांचा आरोप! 

दोन्ही कुटुंबिय त्यांच्या घराच्या दारातच उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनी कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. आरोपींना फाशी होऊन इतर आरोपींना तातडीने अटक व्हावी, अशी मागणी या वेळी कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली.
राधाकृष्ण विखेंचा नगर पोलिसांवर दबाव; कोतकर-ठुबे कुटुंबियांचा आरोप! 

नगर : संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्त्येप्रकरणी अद्यापही काही आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे दोन्ही कुटुंबियउ पोषणाला बसले आहेत. विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पोलिसांवर दबाव आणत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

मृत कोतकर व ठुबे यांचे नातेवाईक संग्राम कोतकर, प्रमोद ठुबे, सुनीता कोतकर, अनिता ठुबे यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्‍याम पाटील यांना निवेदन दिले आहे. या प्रकरणाची चौकशी निःपक्षपणे व्हावी. राजकीय दडपणाखाली चौकशी होऊ नये, तसेच मोकाट असलेल्या आरोपींना तातडीने अटक करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. 

या प्रकरणात आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, भानुदास कोतकर यांच्याविरोधात गुन्हे दाखल असताना केवळ आमदार संग्राम जगताप यांना अटक केली आहे. या लोकांना राजकीय वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ आहे. हत्त्याकांडानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अनेक नेत्यांबरोबरच कॉग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आमदार जगताप यांना गुन्ह्यात गोवले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय दबाव आणल्याने पोलिस त्यांना अटक करू शकत नाहीत.

भानुदास कोतकर हे शिरुर (पुणे) येथील पोलिस ठाण्यात हजेरी लावत असतानाही तेथे का अटक होत नाही, यावरून तपास यंत्रणा आरोपींना मदत करीत असल्याचे दिसून येते, असा आरोप या कुटुंबियांनी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com