माझी निष्ठा फक्त पवार साहेबांवर : सुनील तटकरे

माझी निष्ठा फक्त पवार साहेबांवर : सुनील तटकरे

पुणे : माझे विचार, माझी निष्ठा केवळ शरद पवार साहेबांसोबत आहे. अफवा पसरवून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काही मंत्र्यांच्या भेटींसंदर्भात उठणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेईल आणि त्यावेळी मी आणि माझा रायगड लोकसभा मतदारसंघ आदरणीय पवार साहेबांसोबत भक्कमपणे उभे असू, असेही तटकरे यांनी म्हटले आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातील काही महत्त्वाच्या विकासकामांसंदर्भात मी काल महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. मात्र याबाबत वेगवेगळ्या बातम्या प्रसारित होत आहेत. मी काल केवळ चंद्रकांत पाटील यांनाच भेटलो नाही तर चार मंत्र्यांना भेटलो, त्यात शिवसेनेचे मंत्रीही होते, तसेच चार सचिवांनाही भेटलो, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

दापोली येथील कुणबी समाज संघाला जागा मिळवण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांना भेटलो. गुहागर, दापोली, खेड, मंडणगड येथील हायब्रीड अॅन्यूटीमधील रस्त्यांबाबतही त्यांना भेटलो. काल पर्यटनमंत्री जयकुमार रावल, शिवसेनेचे राज्यमंत्री दादाजी भुसे, तसेच काही सचिवांनाही भेटलो. लोकसभा निवडणुकीत मी जी कामे करण्याचे आश्वासन दिले होते, त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी मी या सगळ्यांना भेटलो, असा दावा त्यांनी केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com