my enemy want to stop my voice rahul gandhi | Sarkarnama

आवाज बंद करण्यास  विरोधक उतावीळ : राहुल 

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

सुरत : माझा आवाज बंद करण्यासाठी माझे राजकीय विरोधक उतावीळ झाले आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी ते आज येथील न्यायालयात हजर झाले होते. 

"सगळ्या चोरांचे आडनाव मोदी कसे असते?' असे विधान राहुल यांनी एप्रिल महिन्यात कर्नाटकातील एका प्रचारसभेत केले होते. यावरून त्यांच्याविरोधात भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीला हजर राहत राहुल यांनी त्यांच्यावरील आरोपांचा इन्कार केला.

 यानंतर त्यांनी ट्‌विट करत विरोधकांवर टीका केली. "माझा आवाज बंद करण्यासाठी उतावीळ असलेल्या राजकीय विरोधकांनी दाखल केलेल्या तक्रारीप्रकरणी सुनावणीसाठी मी आज हजर राहिलो. मला पाठिंबा देण्यासाठी येथे मोठ्या संख्येने आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे,' असे राहुल म्हणाले. 

राहुल गांधी यांनी त्यांच्यावरील आरोपांचा इन्कार केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी पुढील सर्व सुनावणींसाठी राहुल यांना प्रत्यक्ष उपस्थितीपासून सूट द्यावी, असा अर्ज न्यायालयात सादर केला. पूर्णेश मोदी यांनी या अर्जावर आक्षेप घेतल्यावर न्यायालयाने 10 डिसेंबरला यावर सुनावणी घेण्याचे जाहीर केले. या सुनावणीसाठी राहुल यांना अनुपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख