माझा 'डीएनए' विरोधी पक्षाचा : देवेंद्र फडणवीस

देशाच्या इतिहासात इतका अंतर्विरोध असलेल्या पक्षांचं सरकार चाललेलं नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे परस्पर व टोकाचा विचार असलेले राज्यातील तीन पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार हे किती दिवस टिकेल, हे सांगता येत नाही - देवेंद्र फडणवीस
We Will Be Strong Opposition Party Say Devendra Fadanavis
We Will Be Strong Opposition Party Say Devendra Fadanavis

पिंपरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे सरकार नवीन असल्याने काही दिवस त्यांना देणार आहे. नंतर, मात्र त्यांना धारेवर धरणार आहे. कारण माझा डीएनएच विरोधी पक्षाचाच आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून जी भूमिका घ्यायची ती घेणारच आहे, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारला दिला आहे. दरम्यान,अजूनही खातेवाटप न झाल्याने महाराष्ट्र कसा चालेल, अशी विचारणा त्यांनी केली.

देशाच्या इतिहासात इतका अंतर्विरोध असलेल्या पक्षांचं सरकार चाललेलं नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे परस्पर व टोकाचा विचार असलेले राज्यातील तीन पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार हे  किती दिवस टिकेल, हे सांगता येत नाही,असे म्हणत ते जास्त काळ टिकणार नाही, हे फडणवीस यांनी सूचित केले. तसेच हे सरकार फक्त निगेटीव्ह निर्णय घेत असल्याची टीकाही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केली.  

शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र आहे. ती आमच्यापासून दूर गेली आहे. त्यामुळे त्यांनी ठरवायचं आहे, पुन्हा एकत्र यायचं की कसं, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला आवतण दिलं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com