वादावादी झाली पण; मटणाचा दर कोल्हापुरात असा ठरला....

कोल्हापूरमधील आंदोलनाचे पडसाद आता राज्यात इतरत्र उमटणार का, याची आता उत्सुकता आहे.
kolhapur Mutton prices skyrocket
kolhapur Mutton prices skyrocket

कोल्हापूर ः शहरामध्ये सुरू असणाऱ्या मटण दरवाढीचा प्रश्‍नावर अखेर पडदा पडला. जिल्हाधकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 480 रुपये दर निश्‍चित करण्यात आला असून हा दर सहा महिन्यांसाठी असणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दरनियंत्रणासाठी एक समिती नेमली असून, त्यामध्ये 22 सदस्य असतील. या समितीची बैठक दर तीन महिन्यांनी होणार आहे. मटण दरवाढीच्या पार्श्‍वभूमीवर आज शिवाजी मंदिर येथे अंतिम बैठक घेण्यात आली. कृती समितीचे सदस्यांनी बंद खोलीत चर्चा करून 470 रुपये किलो दराची भूमिका मांडली.

ग्राहकांची आग्रही मागणी लक्षात घेऊन आम्ही 480 दर निश्‍चित करतो, असे खाटीक समाजाचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी सांगितले. त्यानंतर सर्वांनी खाटीक समाजाचे अभिनंदन करून बैठकीचा समारोप केला. त्यानंतर कृती समितीचे सदस्य आणि खाटीक समाजाचे प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या ठिकाणी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी 480 दर निश्‍चित असल्याचे सर्वांनी मान्य केले. मात्र हा दर किती काळासाठी असणार यावरून बैठकीत वादावादी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com