mutkule pray to god for mla election | Sarkarnama

देवा चमत्कारासाठी एक संधी दे - मुटकुळेंचे चिंतामणीला साकडे

मंगेश शेवाळकर
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

हिंगोली : देवा, मागील पाच वर्षात विकास कामे केली आता चमत्कार घडविण्यासाठी आणखी एक संधी दे अशा शब्दात आमदार तानाजी मुटकुळे यांनी विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीला गुरुवारी साकडे घातले. येथील विघ्नहर्ता चिंतामणी हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिध्द आहे. गुरुवारी या ठिकाणी मोदकोत्सव साजरा करण्यात आला. सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेऊन नवसाचा मोदक घेतला. मोदक घेतल्यानंतर नवस पूर्ण होतो यामुळे मागील काही वर्षात या ठिकाणी भाविकांची गर्दी चांगलीच वाढू लागली आहे. यावर्षी सुमारे पावणेतीन लाख मोदकांचे वाटप केले. तर हजारो भाविकांनी दर्शन घेतले. 

यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनीही गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी गणपतीला काय मागणे मागितले अशी विचारणा केली असता, जनतेची पाच वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यातून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला अन विधानसभा मतदार संघात विकास कामे करण्यात आली. सिंचनाचा अनुशेष देखील वेगळा करून घेतला. तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठीही मोठा निधी आणता आला आहे. जनतेच्या विकासाच्या आपेक्षा देखील पूर्ण केल्या आहेत. जनतेला टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. आता आणखी एक संधी देण्याचे मागणे देवाकडे मागितले आहे. विधानसभा मतदार संघात विकास करून चमत्कार दाखविण्यासाठी आणखी एक संधी देण्याचे मागणे देवाकडे मागितल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी देखील चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख