muslim mla demond reservation in assembly | Sarkarnama

मुस्लिम आमदार आक्रमक, राजदंड पळविण्याचा प्रयत्न 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

मुंबई : मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण तसेच दुष्काळी मदतीच्या मुद्यावर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.20) सुद्धा विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. यावेळी काही सदस्यांनी राजदंडही पळवून नेला. 

मुंबई : मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण तसेच दुष्काळी मदतीच्या मुद्यावर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.20) सुद्धा विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. यावेळी काही सदस्यांनी राजदंडही पळवून नेला. 

कामकाज सुरु होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी राज्य सरकारविरोधी पोस्टर्स फडकावत घोषणाबाजी केली. तसेच मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षण आणि दुष्काळी मदत म्हणून सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपये देण्याची जोरदार मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानभवनात प्रवेश करत असताना विरोधकांनी मोठ्या आवाजात घोषणा दिल्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या मार्गाने प्रवेश केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आदींसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. 

त्यानंतर विधासभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन विरोधकांचा नियम 57 अन्वये स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याची मागणी केली. सर्व कामकाज बाजूला सारुन मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची मागणीही त्यांनी केली. 

मुस्लिम आरक्षणावरून अबु आझमी, अब्दुल सत्तार, आसिफ शेख, अमीन पटेल आणि अस्लम शेख यांनी सभागृहात जोरदार घोषणा बाजी करून मुस्लिमांना आरक्षण का मिळत नाही असा सवाल केला. 

या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने कागदही भिरकावले. त्यानंतर राजदंड पळविण्याच प्रयत्न या संतप्त आमदारांनी केला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख