हा मुस्लिम नेता म्हणतोय शिवसेना देशभर वाढणार...

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
abu ajami criticizes raj on caa
abu ajami criticizes raj on caa

मुंबई ः कोण राज ठाकरे, असा खोचक सवाल करून शिवसेना आता देशभर वाढणार असल्याचे प्रतिपादन समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले.

आमदार अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दिल्याने अबू आझमी आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे कोण आहेत, मनसेचा फक्‍त एक आमदार आहे. राज ठाकरेंना मीडियाने मोठे केले आहे. शॅडो कॅबिनेट वगैरे हे केवळ नाटक आहे. आता राज ठाकरेंचे कोणतेही स्थान नाही, असे अबू आझमी म्हणाले.

मला बदबू आझमी म्हणणारे राज ठाकरे त्रस्त आहेत आणि त्यांचे आमदारच निवडून येत नाहीत. ना आमदार, ना नगरसेवक. थकलेल्या, हरलेल्या राज ठाकरेंना कुणीच जवळ न केल्याने, ते भाजपसोबत जात आहेत. शिवसेना तीस वर्षापासून कार्यरत आहे. त्यांना भाजपने धोका दिला आहे. आता शिवसेना केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये वाढणार आहे, याची मला खात्री आहे, असे आझमी म्हणाले.

राज ठाकरे आता भाजपसोबत जाऊन धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. जो माणूस तडीपार होता, गुजरातच्या जेलमध्ये बंद होता, आज तो देशातील लोकांची नागरिकता तपासत आहे, असे म्हणत अबू आझमींनी अमित शाहांवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले. शिवसेनेविरुद्ध उभे राहून शिवसेनेची जागा घेण्याचा मनसे प्रयत्न करीत आहे. फोन टॅपिंग प्रकरण असो अथवा इतर कोणताही गैरमार्ग, महाविकास आघाडी यामध्ये लक्ष घालेल, असेही अबू आझमींनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी मुस्लिमांच्या नावावे ढोल बडवू नयेत :  प्रकाश आंबेडकर
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याची घोषणा करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फटकारले आहे. राज ठाकरे यांच्याकडे भारतामध्ये किती पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोक आले आहेत, याचा नेमका आकडा आहे का, अन्यथा त्यांनी तथ्यहीन बोलू नये. तसेच उगाच मुसलमानांच्या नावानेही ढोल बडवू नये, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी केली.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी व केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात वंचित ने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रकाश आंबेडकर प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यांना प्रसिद्धी देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची मदत करू नये, असे आवाहनही केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com