...आता मुस्लीम समाजाचाही भिवंडी ते मुंबई लॉंग मार्च

''राज्यातील मुस्लीम समाजातील पन्नास पोटजातींना यापुर्वी पाच टक्के आरक्षण देण्यात आले होते. त्याची तातडीने कार्यवाही करावी. मुस्लीम समाजातील गंभीर समस्यांचे लवकरात लवकर निवारण न झाल्यास येत्या 24 फेब्रुवारीला भिवंडी ते मुंबई विधान भवनापर्यंत पदयात्रा काढू. 26 फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येईल," असा इशारा आमदार आसिफ शेख यांनी दिला आहे.
...आता मुस्लीम समाजाचाही भिवंडी ते मुंबई लॉंग मार्च

मालेगाव : ''राज्यातील मुस्लीम समाजातील पन्नास पोटजातींना यापुर्वी पाच टक्के आरक्षण देण्यात आले होते. त्याची तातडीने कार्यवाही करावी. मुस्लीम समाजातील गंभीर समस्यांचे लवकरात लवकर निवारण न झाल्यास येत्या 24 फेब्रुवारीला भिवंडी ते मुंबई विधान भवनापर्यंत पदयात्रा काढू. 26 फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येईल," असा इशारा आमदार आसिफ शेख यांनी दिला आहे.

आमदार शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मागणीचे निवेदन सादर केले आहे. 'राज्यातील मुस्लीम समाज शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. सच्चर, मिश्रा व महेमुदूर रहेमान समितीने तसा अहवाल दिला आहे. शासनाने त्यातील शिफारशी मान्य केल्या आहेत. राज्य शासनाने पाच टक्के आरक्षण मंजूर केले. उच्च न्यायालयाने नोकरीतील आरक्षण रद्द करुन शिक्षणातील पाच टक्के आरक्षण कायम ठेवले. मात्र शिवसेना, भाजप सरकारने शिक्षणातील पाच टक्के आरक्षणाबाबत कार्यवाही केली नाही. त्यामुळे त्याविषयीचा अध्यादेश रद्द झाला' असे निवेदनात म्हटले आहे.

'मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे. शाह, छप्परबंद, फकीर समाजाला जात व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. मुस्लीम समाजबांधवांच्या संरक्षणासाठी ऍट्रॉसिटी सारखा कायदा करावा. मुस्लीम मेहतर समाजाच्या सफाई कामगारांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काचा लाभ देण्यात यावा. महेमुदूर रहेमान समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. मुस्लीम अल्पसंख्याक नागरी वस्ती सुधार योजना लागू करावी. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी निधीची तरतूद करावी,' आदी मागण्यांसाठी सध्या पाठपुरावा सुरु आहे. त्याचे निराकरण न झाल्यास भिवंडी ते मुंबई मोर्चा काढला जाईल, असा इशारा आमदार शेख यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com