मुस्लिम समाजाचा इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा - muslilm community supports harshwardhan patin in indapur | Politics Marathi News - Sarkarnama

मुस्लिम समाजाचा इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा

संदेश शहा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

इंदापूर : इंदापूर येथे झालेल्या मुस्लिम समाज बांधवांच्या मेळाव्यामध्ये मुस्लिम समाजाने इंदापूर विधानसभेचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), शिवसंग्राम, रयत क्रांती शेतकरी संघटना या महायुतीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज उपस्थित राहिले.

 हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' 1952 पासून पाटील कुटुंबीय मुस्लिम समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. विरोधी पक्षाकडून जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कलम 370 व 35 अ बद्दल अफवा पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला जात आहे. भारतीय जनता पार्टी सर्वांना बरोबर घेऊन विकास साधत आहे. सबका साथ सबका विकास याप्रमाणे विकास साधला जाणार आहे.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आप्पासाहेब जगदाळे, महेमुद मुलाणी, इब्राहिमबाबा शेख, जावेदभाई शेख, शकीलभाई सय्यद, उस्मानभाई शेख, अफसर मोमीन, सचिन मुलाणी, दादाभाई शेख, रज्जाक मुलानी, अमीर सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले.

 यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दादाभाई मुलाणी, खजिनदार सलीम शेख, मुक्तार मुलाणी, कैलास कदम, शेरखान पठाण ,अब्दुल पठाण, चाँदभाई पठाण, महेबुब मुलाणी, अखिल मोमीन, गुड्डू मोमीन, बबलू पठाण, डॉ रियाज पठाण उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिरोज शेख यांनी केले. आभार शहानुर मुलाणी यांनी मानले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख