तुम्ही योग्य वेळ साधली : मुश्रीफांना पी. एन. यांची कोपरखळी

दुपारी बाराच्या सुमारास पहिल्यांदा गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे शुभेच्छा देण्यासाठी आले तोपर्यंत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याही वाहनांचा ताफा याठिकाणी आला. दोघांनी एकत्रित पी. एन. यांना शुभेच्छा दिल्या. श्री. मुश्रीफ यांनी शाल, श्रीफळ देऊन पी. एन. यांचा सत्कार केला. यावेळी "तुम्ही सतेज पाटील यांच्यासोबत येऊन योग्य वेळ साधली' असे पी. एन. म्हणताच सगळेच हास्यकल्लोळात रंगले.
तुम्ही योग्य वेळ साधली : मुश्रीफांना पी. एन. यांची कोपरखळी

कोल्हापूर : वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत आलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना " तुम्ही योग्य वेळ साधली' अशी कोपरखळी करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांनी मारताच हास्याचे फवारे उडाले. दरम्यान, पी. एन. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर आज सर्वच स्तरातील घटकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. विधानसभेच्या निवडणुकीतील विजयानंतरच्या पहिल्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा पी. एन. यांनी निवासस्थानाशेजारील एका सभागृहात स्वीकारल्या. 

दुपारी बाराच्या सुमारास पहिल्यांदा गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे शुभेच्छा देण्यासाठी आले तोपर्यंत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याही वाहनांचा ताफा याठिकाणी आला. दोघांनी एकत्रित पी. एन. यांना शुभेच्छा दिल्या. श्री. मुश्रीफ यांनी शाल, श्रीफळ देऊन पी. एन. यांचा सत्कार केला. यावेळी "तुम्ही सतेज पाटील यांच्यासोबत येऊन योग्य वेळ साधली' असे पी. एन. म्हणताच सगळेच हास्यकल्लोळात रंगले. 

वाढदिवसानिमित्त पी. एन. यांना शुभेच्छा देण्यासाठी झुंबड उडाली होती. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, महापौर सौ. सूरमंजिरी लाटक, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, चंद्रकांत जाधव, राजू आवळे, प्रकाश अबीटकर, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, "शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, "गोकुळ' चे अध्यक्ष रविंद्र आपटे यांच्यासह सर्व संचालक, बाजार समितीचे सभापती दशरथ माने, राज्य बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, उद्योजक व्ही. बी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य अंबरिश घाटगे, युवराज पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, नाविद मुश्रीफ, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, महापालिकेतील ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, माजी महापौर बाजीराव चव्हाण, माजी नगरसेवक राजेश लाटकर, सचिन चव्हाण यांच्यासह महापालिकेतील नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आदिंनी पी. एन. पाटील यांना भेटून शुभेच्छा दिल्या. 
फोनवरून नेत्यांच्या शुभेच्छा 
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार वैभव नाईक यांच्यासह राज्यातील कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पी. एन. यांना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com