पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा 

किस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना येथील विशेष न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निकालामुळे पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एका लष्करशहाला फाशीची शिक्षा झाली आहे.
परवेझ मुशर्रफ (छायाचित्र - पीटीआय)
परवेझ मुशर्रफ (छायाचित्र - पीटीआय)

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना येथील विशेष न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निकालामुळे पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एका लष्करशहाला फाशीची शिक्षा झाली आहे. 

मुशर्रफ यांनी 2007 मध्ये राज्यघटनेला बाजूला करीत आणीबाणी लागू केली होती. त्यासंदर्भातील हा खटला आहे. या खटल्याचा सखोल निकाल पुढील 48 तासांत घोषित करण्यात येणार आहेत. मुशर्रफ यांनी मार्च 2016 मध्ये वैद्यकीय उपचारासाठी दुबई गाठली होती. सुरक्षा आणि आरोग्याच्या कारणावरून ते पुन्हा पाकिस्तानात परतले नाहीत. 

पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती वाकर अहमद सेठ यांच्या नेतृत्वाखाली या खटल्यासाठी त्रिसदस्यीय विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. सिंध उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नझर अकबर आणि लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शाहीद करीम हे अन्य दोन न्यायाधीश या विशेष न्यायालयाचे सदस्य आहेत. मुशर्रफ यांना फाशी देण्याचा निकाल 2-1 असा लागला आहे. 19 नोव्हेंबर रोजी राखून ठेवलेला हा निकाल आज घोषित करण्यात आला. सखोल निकाल पुढील 48 तासांत उपलब्ध होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com