Murder Suspect Police Officer in Promotion List | Sarkarnama

हत्या प्रकरणातील पोलिस निरिक्षकाचे पदोन्नती यादीत नाव - गृहखात्याने अभय दिल्याचा आरोप

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 जून 2018

महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरचे नाव पदोन्नतीच्या यादीत आल्याने खळबळ उडाली आहे. गृहखात्याकडून अभय मिळाल्याचे त्याच्या कृतीतून दिसून येते, असा आरोप अश्‍विनी यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे.

नवी मुंबई  : महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरचे नाव पदोन्नतीच्या यादीत आल्याने खळबळ उडाली आहे. गृहखात्याकडून अभय मिळाल्याचे त्याच्या कृतीतून दिसून येते, असा आरोप अश्‍विनी यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे.

कुरुंदकर सहा महिन्यांपासून तळोजा तुरुंगात आहे. गृह विभागाने गुरुवारी पोलिस निरीक्षक आणि वरिष्ठ निरीक्षकांना पोलिस उपअधीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्तपदी बढती देण्यासाठी निवडसूची प्रसिद्ध केली. महाराष्ट्र राज्य अपर पोलिस महासंचालक संदीप बिश्‍नोई यांच्या स्वाक्षरीने ही निवडसूची जारी करण्यात आली आहे. या यादीत कुरुंदकरच्या नावाचा समावेश दिसून येतो. त्याचा सेवाज्येष्ठता क्रमांक 856 दाखविण्यात आला आहे.

कुरुंदकरने सहकारी महिला अधिकाऱ्याची ज्या पद्धतीने हत्या केली, ते पाहता त्याला फाशीची शिक्षाही कमीच आहे; मात्र त्याऐवजी पोलिस खाते जर त्याच्या गळ्यात बढतीची माळ घालत असेल तर हा आरोपीला वाचवण्याचा सरकारचा डाव आहे.
राजू गोरे, अश्‍विनी बिद्रेंचे पती

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख