तुमची चौकशी सुरु झाल्यावर रडू नका : मुनगंटीवार

तुमची चौकशी सुरु झाल्यावर रडू नका : मुनगंटीवार

मुंबई : वृक्षलागवडीवर आमची चौकशी लावत आहात पण तुमच्या चौकशा लागल्या तर रडू नका असा इशारा भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वृक्षलागवडीसारख्या ईश्वरी कार्यावर शंका घेणारे तुम्ही कोण, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. ते पुढे म्हणाले की, ज्यांनी झाडाचे कलम सोडाच साधे एक पान देखील लावले नाही, त्यांनी शंका कशासाठी घ्यावी, असा सवाल मुनगंटीवारांनी सरकारला केला आहे. त्यांना फक्त आम्ही केलेला विकास खुपतो असही ते म्हणाले. आता फक्त माझी अपेक्षा एवढीच आहे की, जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका, असा थेट इशारा मुनगंटीवारांनी ठाकरे सरकारला दिला. 

मुनगंटीवार म्हणाले की, वृक्षलागवडी सारख्या ईश्वरी कार्याच्या चौकशीच्यामार्गे काहीतरी करायला जायचे आणि टपली मारुन घ्यायची, असा विचार करु नका. याद राखा, खबरदार, तुम्ही आम्हाला इतरांसारखे समजाल, तर ये तो आग से खेल हैं, असा धमकी वजा इशाराही सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. तुम्ही चौकशी करत असाल तर वन सचिवांकडून नाही तर उच्च न्यालयाच्या न्यायाधीशांकडून करा. आता मीही पाहतो सरकारमध्ये किती दम आहे, असे वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले. 

भाजपचे 10 आमदार तरी फोडून दाखवा 
सत्तांतरानंतर भाजपात गेलेले नेते अस्वस्थ असल्याचा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या कार्यक्रमात केला. त्यावेळी राधाकृष्ण विखे-पाटलांचे नाव न घेता बाळासाहेब थोरातांनी जोरदार टोला हाणला. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी फक्त बोलू नका, तर भाजपचे 10 आमदार तरी फोडून दाखवा असे थेट आव्हान सत्ताधाऱ्यांना दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com