mungantiwar reply on udhhav thackreys criticizm | Sarkarnama

उदयनराजे त्यावेळी विरोधी पक्षात होते: मुनगंटीवार 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

शिवसेना सत्तेत असताना टीका करत होती.

पुणे: उदयनराजे भोसले यांनी ज्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, त्यावेळी ते विरोधी पक्षात होते, असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून नरेंद्र मोदींच्यावर होत असलेल्या टिकेबद्दल खंत व्यक्त केली होती. त्याला उत्तर देत असताना उद्धव ठाकरे यांनी उदयनराजेंनी मोदींवर केलेली टीका कशी काय चालते, असा प्रतिप्रश्न केला होता. त्याला मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे.

उदयनराजे असो की अन्य नेते त्यांनी ज्यावेळी मोदींवर टीका केली त्यावेळी ते विरोधी पक्षात होते. मात्र शिवसेना सत्तेत असताना टीका करत होती. हे चुकीचे आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख