mungantiwar and shivsena | Sarkarnama

वेल प्लेड मुनगंटीवार ...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या अभिनयाने नटलेल्या अनेक चित्रपटात दोघांच्या वादाने प्रेक्षकांना एक जुगलबंदी पाहायला मिळत असे. ऍग्री यंग मॅन अमिताभ त्याच्या पद्धतीने आक्रमक रितीने बाजू मांडत असे आणि त्याला तिक्‍याच शांतपणे शशी कपूर उत्तर देत असे. या दोघांमधला ही रागातील व्यक्ती आणि शांत नायक यांच्यातील प्रसंग प्रेक्षकांच्या मनावर ठसत असत. आत्ता राऊत आणि मुनगंटीवार यांच्यातील वादाच्या प्रसंगात अत्यंत मुद्देसुदरित्या भारतीय जनता पक्षाची बाजू मुनगंटीवार शांतपणे मांडत असत.

मुंबई : राज्यात महायुतीची सत्ता येण्यासाठी राज्यातील जनतेने शिवसेना आणि भाजपला पुरेशा जागा दिल्या मात्र शिवसेनेने आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार व त्याचा कार्यकाळ अडीच वर्षे असणार अशी घोषणा केली. शिवसेनेकडून खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत सातत्याने भाजपवर टीका करत होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे आसूड ओढत असताना त्याचा प्रतिवाद भाजपकडून एकच व्यक्ती करत होती ती म्हणजे सुधीर मुनगंटीवार. राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री असलेल्या मुनगंटीवार यांनी अर्थखात्याची बिकट जबाबदारी जशी कुशलतेने पार पडली तशीच जबाबदारी मुनगंटीवार यांनी पार पाडली ती सेना भाजप यांच्यातील सत्तेवरून झालेल्या वादात. आपल्याकडच्या पत्यामध्ये हुकुमाची फारशी पाने नसली तरी डाव न सोडता किंवा उधळून न लावता ते भाजपचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा किल्ला लढवत होते. 

अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या अभिनयाने नटलेल्या अनेक चित्रपटात दोघांच्या वादाने प्रेक्षकांना एक जुगलबंदी पाहायला मिळत असे. ऍग्री यंग मॅन अमिताभ त्याच्या पद्धतीने आक्रमक रितीने बाजू मांडत असे आणि त्याला तिक्‍याच शांतपणे शशी कपूर उत्तर देत असे. या दोघांमधला ही रागातील व्यक्ती आणि शांत नायक यांच्यातील प्रसंग प्रेक्षकांच्या मनावर ठसत असत. आत्ता राऊत आणि मुनगंटीवार यांच्यातील वादाच्या प्रसंगात अत्यंत मुद्देसुदरित्या भारतीय जनता पक्षाची बाजू मुनगंटीवार शांतपणे मांडत असत. या दोन पक्षांमधला पेच जेव्हा तीव्र बनतोय असे वाटायला लागले तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवटीची भिती पहिल्याप्रथम व्यक्त केली ती मुनगंटीवार यांनीच. त्यावेळी त्यांच्यावर टीकेचे मोहोळ उठले माज्ञ त्यांचा कायद्याचा अभ्यास आणि परिस्थतीचे अचूक मूल्यमापन योग्य ठरले. आज राज्य राष्ट्रवाती राजवटीच्या उंबरठ्यावर उभे आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिक आहेत असे उद्धव ठाकरे यांनी काढलेले उद्‌गार नेमक्‍यावेळी वापरून सुधीरभाऊंनी संजय राऊत यांच्यावर संयमाने मात करत पहिली फेरी जिंकली होती. मुनगंटीवार यांचे खरेतर मातोश्रीशी चांगले संबंध मात्र सध्याच्या वादात त्यांना फार कसरत करायला लागली. मात्र कुठेही तोल ढळू न देता मुनगंटीवार सातत्याने राऊत यांच्या जोरदार बाणांचा मुकाबला करत होते. त्यातही त्यांना हा मुकाबल करताना ठाकरे परिवार कुठे दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागत होती. त्यांनी मी वनमंत्री आहे आणि वाघाचे रक्षण आणि संवर्धन कसे करायचे हे मला चांगले कळते असा युक्तीवाद करून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. नेमक्‍या या संघर्षावेळीच विदर्भात एक वाघ जखमी झाला होता आणि त्याला वाचवण्याचे वनविभागाचे प्रयत्न सुरू होते त्याला उद्देशून आणि शिवसेनेबरोबरच्या सत्तासंषर्घात त्यांचे हे वाक्‍य अनेकांची दाद घेणारी ठरले. राज्याच्या मंत्रिमंडळात फारसे वादग्रस्त न ठरलेले मुनगंटीवार मध्यंतरी "अवनी' वाघिणीच्या हत्येप्रकरणी देशातील पर्यावरणवाद्याच्या टीकेचे लक्ष्य ठरले होते. अगदी केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री मनेका गांधी यांनीही त्यांच्यावर आरोप केले, मात्र सुधीरभाऊ त्यावेळी शांत होते. त्यांनी आपल्यावरचे सर्व आरोप शांतपणे फेटाळून लावले आपली बाजू नेमकेपणाने सगळ्यांना पटवून दिली. आजही सुधीरभाऊ नेमके तेच करत आहेत. वाघांशी सामना करणारा हा वनमंत्री दोन्ही बाजुच्या सत्ताकारणात जनसामान्यांचा अर्थ संपुष्ठात येणार नाही याची अचूक काळजी घेत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख