munde pankaja and bhagwanbaba | Sarkarnama

बीडच्या वाघिणीला मिळाले केंद्रीय गृहमंत्र्यांचे बळ...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

बीड : चार वर्षापूर्वी भगवानगडावर जिची कोंडी करण्यात आली त्याच वाघिणीने भगवानबाबांच्या जन्मगावी त्यांचे मोठे स्मारक उभारून त्या ठिकाणी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना बोलवून आपली ताकद तर दाखवलीच पण आपल्या समाजबांधवांना भक्कम विश्‍वास दिला. ही कथा आहे स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची. 

सावरगाव येथे आज दसरा मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित राहून पंकजा मुंडे यांचे कौतुक केले. ते म्हणाले " वंचित समाजाला गौरव वाटावे व पुढच्या अनेक पिढ्यांना अभिमान वाटावे असे काम पंकजाताईंनी केले आहे. आपण 2014 मध्ये भगवानगडावरील मेळाव्याला उपस्थित राहिलो होतो याचाही आठवण काढली. पंकजा ताईंनी स्माराकाबाबत दिलेला शब्द पुरा केला आहे. मी आज भगवानबाबांचे दर्शन घेतले मला पंकजाताईंनी केलेल्या कामाने आनंद झाला. पंकजाताई स्वर्गीय गोपीनाथरावांचे काम समर्थपणे पुढे नेत आहेत. गोपीनाथरावांची आठवण काढून गोपीनाथरावांनी उसतोडणी कामगारांसाठी केलेल्या कामाची आवर्जून प्रशंसा केली. 

शहा यांनी आज खास या कार्यक्रमासाठी वेळ काढल्याने विधानसभा निवडणुकीला पंकजा मुंडे यांना एकप्रकारे ताकदच मिळाली आहे. निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राज्यातला शहा यांचा हा पहिलाच कार्यक्रम होता. स्वतः शहा यांनी तसा उल्लेख करून भगवानबाबांचा मला आशीर्वाद मिळाला त्याचे सारे श्रेय त्यांनी पंकजाताईंना दिले. महादेव जानकर, राम शिंदे, जयदत्त क्षीरसागर आदी मंत्रीही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख