छत्रपतीच्या नावाने राजकारण करत सरकारकडून जनतेची फसवणूक - धनंजय मुंडे

छत्रपतीच्या नावाने राजकारण करत सरकारकडून जनतेची फसवणूक - धनंजय मुंडे

पैठण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आधी या सरकारने मते मागितली, सत्तेवर आले, पण आता त्यांना महाराजांची गरज राहिलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर फक्त राजकारण करत या सरकारने राज्यातील गोर-गरीब जनता, शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. 

पैठण तालुक्‍यातील बालानगर येथे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलतांना धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टिका केली. धनंजय मुंडे म्हणाले, या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. अरबी समुद्रात महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा दोन वर्षापुर्वी केली होती. पंरतु तिथे अजून खडी देखील टाकलेली नाही. ज्या शेतकरी कर्जमाफीच्या योजनेला शिवाजी महाराजांचे नाव दिले, त्याचा लाभ देखील शेतकऱ्यांना अजून मिळाला नाही. 

केवळ महाराजांच्या नावावर राजकारण करत जनतेला फसवण्याचे काम हे सरकार करते आहे. सत्तेवर येण्याआधी सरकारने राज्यात मेगा भरती करू असे सांगितले होते. पण आता कळते आहे की ही मेगा भरती म्हणजे बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणारी नव्हती, तर पक्ष फोडून इतरांना आपल्या पक्षात घेण्यासाठीची भरती होती. 

ज्या राष्ट्रवादीतील नेत्यांवर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनाच पक्षात घेऊन शुध्द केले. भाजप पक्ष म्हणजे आता काशीचा घाट झाला आहे. भ्रष्टाचाऱ्याने यावे आणि या पक्षात डुबकी लावून स्वःताला शुध्द करून घ्यावे असा टोला देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी लगावला. तेव्हा आरोप करणारे तुमच्या पक्षात आल्यावर शुध्द कसे झाले? याचा जाब जनतेने आता देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे यांना विचारला पाहिजे असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com