भाजपच्या मुंडे, राष्ट्रवादीच्या सोनवणेंना पेड न्यूजबाबत नोटीसा

जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना नोटीसा बजावल्या आहेत. आपले म्हणणे सादर करण्याच्या सुचना नोटीसीत दिल्या आहेत.
भाजपच्या मुंडे, राष्ट्रवादीच्या सोनवणेंना पेड न्यूजबाबत नोटीसा

बीड : लोकसभा निवडणूकीत बीड मतदार संघातून निवडणूक लढवलेल्या भाजपच्या उमेदवार खासदार डॉ. प्रितम मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मंगळवारी नोटीसा बजावण्यात आला. पेड न्यूज प्रकरणी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी या नोटीसा बजावल्या आहेत. दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघात प्रचारा दरम्यान वृत्तपत्रे व माध्यमांद्वारे प्रचारासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचे नोटीसांत म्हटले आहे. 

बीड लोकसभेची निवडणुक अत्यंत चुरशीची आणि राज्यात चर्चेची ठरली. दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणावर ताकद आणि प्रतिष्ठा लावली होती. शेवटच्या टप्प्यात विविध अस्त्रांचा वापर दोन्ही पक्षांनी केला. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने बीड लोकसभा मतदार संघात प्रचारा दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे छायाचित्र जाहिरातीमध्ये अनधिकृतरित्या वापरल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार निवडणूक विभागास प्राप्त झाली. 
दैनिकांमध्ये ही जाहीरात प्रसिद्ध झाली होती. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांच्यासंदर्भात एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरुन तक्रार करणारा अर्ज निवडणूक कार्यालयास प्राप्त झाला होता. दोन्ही तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना नोटीसा बजावल्या आहेत. आपले म्हणणे सादर करण्याच्या सुचना नोटीसीत दिल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com