नमिता मुंदडा यांच्यामुळे वाहनचालकांचा लातूर हेलपाटा वाचला ...

आमदार नमिता मुंदडा व नंदकिशोर मुंदडा यांनी उपविभीय परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेत कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. अंबाजोगाईतच दंड आकारुन दंड भरलेल्या वाहनांचा परवाना निलंबित करु नये, अशी सूचना केली.
 नमिता मुंदडा यांच्यामुळे वाहनचालकांचा लातूर हेलपाटा वाचला ...

अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या उपविभागीय परिवहन अधिकारी कार्यालयाला स्वत:चे वाहन नसल्याने लातूरच्या पथकाने येथील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस आणि रिक्षांवर कारवाई केली. मात्र, या वाहनधारकांना दंड भरण्यासाठी लातूरचे हेलपाटे मारावे लागणार होते. मात्र, या प्रश्नात आमदार नमिता मुंदडा यांनी लक्ष घातल्याने वाहनधारकांचे लातूरचा हेलपाटे वाचणार आहेत. 

अंबाजोगाई येथील उपविभागीय परिवहन अधिकारी कार्यालयाला स्वत:ची इमारत नाही. या ठिकाणी ट्रॅक नसल्याने वाहनधारकांना टेस्टसाठी दुसरीकडे जावे लागते. वाहन नसल्याने या विभागाला कारवाईदेखील करता येत नाही. त्यामुळे बीड किंवा लातूरचे पथक येऊन कारवाई करते. दोन दिवसांपूर्वी वाहनांवर कारवाई करण्यात आली. मात्र, या वाहनधारकांना दंड भरणे, कागदपत्र घेणे आदी कारणांसाठी लातूरचे हेलपाटे मारावे लागणार होते. विशेष म्हणजे दंड भरुनही दहा दिवसांसाठी वाहन परवाना रद्द करण्याची कारवाई देखील करण्यात येत होती. कारवाई केलेल्या वाहनांत परवानाधारक स्कूल बसचाही समावेश होता. त्यामुळे वाहनधारकांसह विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. या प्रश्नावर पुढाकार घेत शनिवारी नमिता मुंदडा व नंदकिशोर मुंदडा यांनी अंबाजोगाई येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. 

कार्यालयातील लेट लतिफ आणि बेशिस्त कारभाराबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर त्यांचीही तारांबळ उडाली. वाहनधारकांचा इथेच दंड भरुन घ्यावा आणि दंड भरलेल्या वाहनांचा परवाना निलंबित करु नये अशी सुचना केली. त्यांची सूचना मान्य झाल्याने वाहनधारकांचा लातूर हेलपाटा वाचणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com