पिंपरी चिंचवमधला कचरा उचलण्यासाठी मुंबईतील वाहने 

पिंपरी चिंचवड शहरात झालेली कचराकोंडी फोडण्यासाठी ठेकेदाराने आता थेट मुंबईहून कचरा वाहतूक करणारी वाहने आणली आहे. गल्लोगल्ली दिसू लागलेली मुंबईतील कचरा वाहतूक करणारी वाहने हाच विषय शहरात सध्या चर्चेचा झाला आहे.
पिंपरी चिंचवमधला कचरा उचलण्यासाठी मुंबईतील वाहने 

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात झालेली कचराकोंडी फोडण्यासाठी ठेकेदाराने आता थेट मुंबईहून कचरा वाहतूक करणारी वाहने आणली आहे. गल्लोगल्ली दिसू लागलेली मुंबईतील कचरा वाहतूक करणारी वाहने हाच विषय शहरात सध्या चर्चेचा झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कचरा संकलन करणे व त्याची वाहतूक करण्याचे काम मे. ए. जी. एन्व्हायरो इन्फा आणि बीव्हीजी कंपनीला दिले आहे. बीव्हीजी कंपनीला पिंपरी चिंचवड शहरातील कचरा उचलण्याच्या कामाचा अनुभव आहे. मात्र मे. ए. जी. एन्व्हायरो इन्फा या कंपनीला या शहरातील कचरा उचलण्याचा अनुभव नाही. मात्र या कंपनीचे मुंबई महापालिकेत काम सुरू आहे.

मे. ए. जी. एन्व्हायरो इन्फा या कंपनीने पिंपरी चिंचवड शहरातील कचरा उचलण्याच्या कामाचा मायक्रो प्लॅन महापालिकेला सादर केला होता. हा प्लॅन फेल गेल्यामुळे शहरात अभूतपूर्व कचराकोंडी झाली.  ठेकेदाराची काही वाहने आरटीओकडून पासिंग झालेली नसल्याने ती वापराविना पडून आहेत. 

शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने संबंधित ठेकेदारास महापालिकेची पन्नास वाहने वापरण्यासाठी दिली आहेत. तरी देखील शहरातील कचरा कोंडी फोडण्यात ठेकेदाराला अपयश आले आहे. 

शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी मे. ए. जी. एन्व्हायरो इन्फा या ठेकेदाराने आपली मुंबईतील कचरा वाहतूक करणारी वाहने पिंपरी चिंचवड शहरात आणली आहेत. रात्री हेडगेवार भवन येथे ही वाहने उभी केली जातात. शहरातील रस्त्यांवर दिसणारी मुंबई महापालिकेची वाहने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com