मोदींच्या आवाहनाला मुंबईकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद 

मोदींच्या आवाहनाला मुंबईकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद 

मुंबईतच नव्हे राज्याच्या खेडोपाड्यातही प्रतिसाद मिळाला.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री 9 वाजून 9 मिनिटांसांठी लाईट बंद करून दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला मुंबईकरांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.मुंबईतील धारावीभागात मोदींच्या आवाहनानुसार घरी दिवे लावण्या ऐवजी रस्त्यावर तरुणांनी हवाई कंदील जाळले. 

यावेळी "भारतमाता की जय'च्या जोरदार घोषणा देण्यात आले. कोरोनाचे संकट नष्ट करण्यासाठी तसेच अंधारातून प्रकाशाकडे येण्याचे आवाहन मोदी केले होते. त्याला मुंबईतच नव्हे राज्याच्या खेडोपाड्यातही प्रतिसाद मिळाला. मोदी विरोधी असलेल्या मंडळींनी मात्र दिवे लावले नाहीत.

आज महाराष्ट्रात उर्जा मंत्रालयाने वीज बंद केली नव्हती. तर प्रत्येक घरात वीज पुरवठा सुरू होता. लोकांनी नऊ मिनीटांसाठी वीज बंद करून अंधारात घरातील दिवे, मोबाईलचा टॉर्च लावला. अनेक ठिकाणी भारतमाता की जयच्या घोषणा देताना फटाक्‍याचीही आतषबाजी करण्यात आल्याचे दृश्‍य होते. 

दरम्यान, एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमी सोशल डिस्टींनिंग राखण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच नेते करीत आहेत तरीही दिेवे लावण्याच्या नादात उत्साही मंडळींनी सोशल डिस्टींनिंगचे भान राहिले नाही.

पाच दहा ते पंधराजण एकत्र येऊन मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत होते. मात्र आपण काळजी घेतली पाहिजे याचे भान राहिले नाही. तरीही भारतमातेसाठी मुंबईकरांनी मोदींच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com