Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडे उरले दोन कॅबिनेट मंत्र्यांसह केवळ पंधरा आमदार! ही नावं पक्की...

एकनाथ शिंदे यांच्यासोबत 46 आमदार असल्याचे सांगितले जात आहे.
Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांचं आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्वात मोठं बंड असल्याचे मानले जात आहे. या बंडानं पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्याकडे जवळपास 40 हून अधिक आमदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरे यांच्याकडील आमदारांची संख्या सध्या तरी 15 वर थांबली आहे. त्यामध्ये दोन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. (Eknath Shinde Latest News)

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील (Shiv Sena) समर्थक आमदारांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. शिंदे समर्थक आमदारांनी बुधवारी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रावर चार अपक्षांसह 34 आमदारांच्या सह्या होत्या. त्यानंतर जवळपास डझनभऱ आमदार गुवाहाटीत दाखल झाले आहेत. आज दिवसभरात आणखी आमदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. (Uddhav Thackeray Latest Marathi News)

Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
शिंदेंची ताकद वाढतच चाललीय; बारा खासदारही ठाकरेंची साथ सोडणार?

ठाकरे यांच्याकडील संख्याबळ दिवसागणिक कमी होत चालली आहे. त्यांच्याकडे आता मोजकेच शिलेदार उरले आहेत. त्यामध्ये आदित्य ठाकरे आणि उदय सामंत हे दोनच मंत्री आहेत. सुनील प्रभू, अजय चौधरी, भास्कर जाधव, नितीन देशमुख, कैलास पाटील, रविंद्र वायकर, सुनिल राऊत, वैभव नाईक, प्रकाश फातर्पेकर, संजय पोतनीस, सुजित मिंचेकर, राजन साळवी व रमेश कोरगांवकर या आमदारांचा समावेश आहे.

ठाकरे यांच्याकडे उरलेल्या पंधरा आमदारांपैकी आता कोणी शिंदे यांच्याकडे जाणार नाही, अशी आशा ठाकरेंना आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपण्यात आली आहे. शिंदे गटात गेलेल्या इतर आमदारांना परत आणण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी टाकल्याचे समजते. त्यामुळे किती बंडखोर आमदार ठाकरेंच्या गळाला पुन्हा लागणार, याबाबत उत्सुकता आहे.

Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
आकडे जुळले; आशिष जयस्वाल, केसरकरांसह आणखी चार आमदार गुवाहाटीत

दरम्यान, गुरूवारी सकाळी शिवसेना (Shiv Sena) समर्थक रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) हेही गुवाहाटीत दाखल झाले. त्यांनी मागील काही दिवसांत महाविकास आघाडीबाबत नाराजी व्यक्त केली होती. आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीही राष्ट्रवादीवर निशाणा साधत शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे एक दिवसापूर्वीच सांगितले होते. तेही सकाळी शिंदे गटात सामील झाले. मुंबईतील आमदार सदा सरवणकर व मंगेश कुडाळकर यांनीही गुवाहाटी गाठले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com