झेडपी, पंचायत समिती निवडणूक : बविआ ओबीसी जागेवर ओबीसीच उमेदवार देणार...

बविआचे जेष्ठ नेते आणि माजी महापौर नारायण मानकर यांनी ओबीसींच्या जागेवर ओबीसी उमेदवार देण्याचे संकेत दिले असून याबाबत पक्षाची उद्या बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
झेडपी, पंचायत समिती निवडणूक : बविआ ओबीसी जागेवर ओबीसीच उमेदवार देणार...
In ZP, Panchayat Samiti elections, Bavia will field OBC candidates for OBC seats ...

विरार : पालघर जिल्हा परिषदेच्या १५ जागांसाठी येत्या पाच ऑक्टोबरला निवडणूक होणार असून यासाठी साऱ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. ओबीसींच्या मुद्यावरून १५ जणांना बाद केल्याने ही निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत सारेच पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याने निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंग भरणार आहेत. या निवडणुकीत ओबीसींच्या जागेवर बविआ ओबीसी उमेदवारच देणार असल्याचेही बविआचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितल्याने ओबीसी उमेदवारांचे चेहरे खुलले आहेत. In ZP, Panchayat Samiti elections, BVA will field OBC candidates for OBC seats ...

ओबीसींच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असून, ओबीसी आरक्षणाशिवाय पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक पाच ऑक्टोबरला होत आहे. या निवडणुकीत ओबीसी उमेदवारांचे काय होणार त्यांना उमेदवारी मिळणार की, इतरांना उमेदवारी मिळणार याबाबत येथील उमेदवार देव पाण्यात ठेऊन बसले आहेत. 

असे असताना काँग्रेस पाठोपाठ बविआनेही ओबीसी जागेवर ओबीसी उमेदवार देण्याचे संकेत दिल्याने भावी उमेदवारांचे चेहरे खुलले आहेत. याबाबत बविआचे जेष्ठ नेते आणि माजी महापौर नारायण मानकर यांनी ओबीसींच्या जागेवर ओबीसी उमेदवार देण्याचे संकेत दिले असून याबाबत पक्षाची उद्या बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in