ZP News: जिल्हा परिषदांतील रखडलेली पदभरती तत्काळ करा ; ग्रामविकास विभागाचे आदेश

Gramvikas Department : मागील साडेतीन वर्षांत विविध कारणानं जिल्हा परिषदेतील पदभरती वादग्रस्त ठरली आहे.
Zp news
Zp newsSarkarnama

Zilha Parshad Latest News: जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया मागील चार वर्षांपासून विविध कारणाने रखडल्या आहेत. त्यात राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार पदांच्या भरतीची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात कोणतीच हालचाल होत नसल्यानं विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याचदरम्यान, राज्याच्या ग्रामविकास विभागानं महत्वपूर्ण आदेश दिले आहेत.

ग्रामविकास विभागानं सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रखडलेली पदभरती तत्काळ करा असे आदेश दिले आहेत. यासंबंधीचं पत्रक उपसचिव विजय चांदेरे यांनी प्रसिध्द केलं आहे. या आदेशामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Zp news
BJP News : धनंजय महाडिकांनी शब्द खरा केला : परिचारकांच्या विरोधात समाधान आवताडेंना पाठबळ

मागील साडेतीन वर्षांत विविध कारणानं जिल्हा परिषदेतील पदभरती वादग्रस्त ठरली आहे. रखडलेली ही भरती तत्काळ करण्यात यावी, अशा मागण्या विद्यार्थी संघटना करत आहे. पदभरतीच्या वाढत्या असंतोषाची दखल ग्रामविकास विभागाच्या आदेशात घेण्यात आली आहे. पदभरतीच्या आदेशामुळं उमेदवारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

Zp news
Shivsena : भाजपच्या ऑफरवर खैरे म्हणाले, कराडांना पॉलिटिकल मॅच्युरिटी नाही..

यंदा पदभरतीची घोषणा करतानाच सर्वसाधारण वेळापत्रक घोषित करण्यात आली होती. मात्र, या वेळापत्रकानुसार कोणतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. याच धर्तीवर भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचे वय दिवसेंदिवस वाढत असून, भरती होत नसल्यानं तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य पसरलं आहे.

जिल्हा परिषदेतील (ZP) भरती प्रक्रिया मागील चार वर्षांपासून विविध कारणानं रखडल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणतीच हालचाल होत नसल्यानं विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या भरतीच्या अनुषंगानं सुमारे १३ लाख सुशिक्षित बेरोजगारांकडून परीक्षा शुल्क म्हणून गोळा केलेली २५ कोटी ८७ लाख रुपयांची रक्कमही शासनदरबारी आहेत.

याबाबत कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड म्हणाले, जिल्हा परिषदमधील विविध पदांच्या २०१९ पासून रखडलेल्या १३ हजार ५२१ जागांची तत्काळ पदभरती घेण्यात यावी. या मागणीसाठी आझाद मैदानावर आम्ही लाक्षणिक उपोषण करत आहोत. तसेच सकाळनेही वेळोवेळी या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. अखेरीस यासंदर्भात पदभरतीची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश विजय चांदेकर उपसचिव ग्रामविकास यांनी सर्व जिल्हा परिषदेला दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in