ZP Election Result 2021: खासदार राजेंद्र गावितांचा मुलगा पराभूत

राजेंद्र गावितांनी शिवसैनिकांचा विरोध डावलून आपल्या मुलाला उमेदवारी दिल्याने रोहित गावितांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे.
ZP Election Result 2021: खासदार राजेंद्र गावितांचा मुलगा पराभूत

पालघर जिल्हा परिषद निवडणूकीचे सर्व निकाल ((Palghar ZP Election result 2021) जाहीर झाले असून आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 8 जागांचे निकाल हाती आले आहेत. पालघरमध्ये भाजपा तीन (BJP 3), शिवसेना (Shivsena 2) ,राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागा (NC, माकपा एका जागेवर विजयी झाले आहेत. तर कॉग्रेस आणि बहुजन विकास आघाडीला खातही उघडता आलं नाही.

ZP Election Result 2021: खासदार राजेंद्र गावितांचा मुलगा पराभूत
ZP Election Result 2021: पालघरचे सर्व निकाल जाहीर

एकीकडे विजयाचा जल्लोष असताना दूसरीकडे डहाणूमध्ये मात्र शिवसेना खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांचा पराभव झाला असून भाजप उमेदवार पंकज कोरे यांचा विजय झाला आहे. ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेत पोटनिवडणूका घेण्याचे आदेश दिले. या पोटनिवडणुकीत शिवसेनेने स्थानिक उमेदवाराला डावलून रोहित गावित (Rohit Rajendra Gavit) यांना संधी दिली होती.

डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गटात खासदार राजेंद्र गावित यांनी स्थानिक शिवसैनिकांना डावलून आपला राजकीय वारसदार म्हणून स्वत:चा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून उमेदवारी दिली. रोहित गावितांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. यामुळेच रोहित गावितांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in