Silver Oak Attack : टिकेचे धनी झालेल्या गृहमंत्र्याचा मोठा निर्णय

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
Sharad Pawar| Silver Oak
Sharad Pawar| Silver Oak Sarkarnama

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्यात झालेल्या बैठकीनंतर झोन २ चे डीसीपी योगेश कुमार यांना पदावरुन हटावण्यात आले आहे. योगेश कुमार यांचा तात्पुरता चार्चज नीलोत्पल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

पवार यांच्या घरासमोर घडलेल्या घटनेमुळे सर्वच स्तरातून पोलिसांवर टीका होत होती. त्यातच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरही सर्व पक्षीय नेत्यांनी निशाणा साधला होता. त्यानंतर डीसीपींना पदावरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. दरम्यान, एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना शुक्रवारी (ता. ८ एप्रिल) रात्री गावदेवी पोलिसांकडू अटक करण्यात होती. त्यांना आज (ता. ९ एप्रिल) न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सिल्व्हर ओक परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या ११० आंदोलक कर्मचाऱ्यांचाही जामीन अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Sharad Pawar| Silver Oak
पवारांना इजा पोहोचविण्याचा प्रयत्न होता : आव्हाडांचा खळबळजनक आरोप

सदावर्ते यांना गावदेवी ठाण्यातील पोलिस पथकाने शुक्रवारी (ता. ८ एप्रिल) रात्री त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते. तब्बल दीड तासाच्या चौकशीनंतर रात्री दहाच्या सुमारास सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. पवार यांच्या घरावर झालेल्या हलल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.

Sharad Pawar| Silver Oak
Silver Oak Attack : माझ्यावर जबरदस्ती होतेय : कोठडी मिळताच सदावर्तेंचा पोलिसांवर गंभीर आरोप

तसेच पवार यांच्या घरासमोर घडलेल्या घटनेमुळे सर्वच नेत्यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. पवारांच्या घरावरील हा हल्ला म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे अपयश असल्याच्या चर्चा सुरु आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून पोलीस काय करत होते? पोलिस कमी पडले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही पोलीस कमी पडल्याची कबुली देत आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, हल्ल्यामागचा सूत्रधार पोलीस शोधत आहेत. या प्रकरणात पोलीस कुठेतरी कमी पडले. पोलिसांच्या हलगर्जीपणाबाबत वरिष्ठ माहिती घेत आहेत. कारण माध्यमांना माहिती मिळते, पण पोलिसांना का मिळत नाही? हा प्रश्न आहे. त्यानंतर गृहमंत्र्यांनी मोठे पाऊल उचलले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com