भाई जगतापांनी मला शिव्या दिल्या! सिद्दीकींची थेट सोनिया गांधींकडे तक्रार

मुंबई काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या पदयात्रेत आमदार भाई जगताप आणि आमदार झिशान सिद्दीकी भिडले होते.
Bhai Jagtap and Zeeshan Siddique
Bhai Jagtap and Zeeshan SiddiqueSarkarnama

मुंबई : मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसने (Congress) नुकतेच जन जागरण अभियान राबवले. याअंतर्गत मुंबई काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या पदयात्रेत आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) आणि आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) भिडले होते. यानंतर आता सिद्दीकी यांनी थेट सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून जगताप यांची तक्रार केली आहे. जगताप यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

मुंबई काँग्रेसतर्फे 14 नोव्हेंबरला राजगृह (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान) ते चैत्यभूमी, दादर दरम्यान पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेच्या सुरूवातीला नेत्यांसाठी एका ट्रकला सजवून रथाचे स्वरूप देण्यात आले होते. नेत्यांनी या ट्रकचा ताबा घेण्यास सुरू केली होती. यादरम्यान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार भाई जगताप व मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार झिशान सिद्दीकी यांच्यात वादाची ठिणगी पडली होती.

ट्रक वर चढण्यावरून जगताप आणि सिद्दीकी यांच्यात झाला वाद झाल्याचे समजते. या वादानंतर सिद्दीकी यांनी पदयात्रेत सहभागी न होता निघून गेले. दोन नेत्यांमधील या वादाने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मोदी सरकार विरोधातील पदयात्रेत भर रस्त्यावरच हा वाद समोर आल्यानं काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचे दर्शन झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Bhai Jagtap and Zeeshan Siddique
अखेर ठरलं! पायलट यांना दिल्लीत प्रमोशन अन् समर्थकांना राज्यात मंत्रिपदे

यानंतर आता सिद्दीकी यांनी थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, मी लोकनियुक्त आमदार असूनही भाई जगताप यांनी माझा अपमान केला. मला त्यांनी अपशब्द वापरले. पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोरच त्यांनी मला तेथून जाण्यास सांगितले. नंतर तिथे उपस्थित कार्यकर्त्यांनी मला सांगितले की ते सगळ्यांशीच अशा पद्धतीने बोलतात. मी व माझ्या समुदायाबद्दल शेकडो कार्यकर्त्यांसमोर अवमानकारक वक्तव्ये त्यांनी केली.

Bhai Jagtap and Zeeshan Siddique
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर मोदी सरकारनंतर तेल कंपन्यांचंही मोठं पाऊल

मला त्यांनी धक्का दिल्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना धक्का दिला. त्यावेळी मी मध्यस्थी करून सगळ्यांना शातं केले. पक्षाची प्रतिमा सार्वजनिक ठिकाणी मलिन होऊ नये, यासाठी मी प्रयत्न केले. मॅडम, आमदार आणि युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा असा अपमान जगताप करीत असतील ते सामान्य कार्यकर्त्यांशी कसे वागत असतील? मी आधीही त्यांच्या विरोधात तुमच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, ही विनंती, असे सिद्दीकी यांनी पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com