
Bharat Gogavale : शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर आमदारांनी आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गटनेते म्हणून निवड केली. आता या सर्व आमदारांसंदर्भातील सर्व निर्णय शिंदेच घेणार असल्याचे शिवसेनेचे महाडचे बंडखोर आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी सांगितले आहे. याबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना आमचा नेता ठरविण्यासाठी आम्हाला एक दिवसाचा वेळ हवा आहे. त्यानंतर आम्ही सांगू, असे गोगावले यांनी म्हटले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
भरत गोगावले म्हणाले, आमच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार व नेते ढवळाढवळ करत आहेत. आम्ही मंजूर केलेली कामे त्यांनी मंजूर केली असे सांगत होते. शिवसेनेचा प्रभाव कमी करत आमच्या मतदारसंघात त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी आम्ही पक्ष नेतृत्वाकडे याबाबत तक्रार केली. मात्र वेळोवेळी आमची गळचेपी केली गेली आणि आम्हाला डावलले गेले. म्हणून आम्ही बंडखोरी केल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या आमदारांची संख्या वाढत असून आणखी आमदार येऊन मिळणार आहे. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जायचे नाही. त्यामुळे भाजप आम्हाला सहकार्य करेल. आम्ही आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शिंदे यांना दिले आहेत तर भाजप सोबतही तेच बोलतील, असेही गोगावले म्हणाले.
दरम्यान, बंडखोर आमदारांच्या गटाला भाजपचा पाठिंबा असल्याचे समोर आले आहे. याबाबतचा बंडखोर आमदारांच्या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आला असून या बैठकीत शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपच्या पाठिंब्याचे संकेत दिले आहेत. शिंदे गटात सामिल झालेल्या आमदारांचे प्रतिनिधित्व करत आमदार तानाजी जाधव यांनी एकनाथ शिंदे हे आपल्या गटाचे नेते असतील, असे सांगत आहेत. यावेळी शिंदे म्हणतात की, भाजपने पाकिस्तानला धडा शिकवलाय. आपण एकजुटीने राहू. कुठेही काहीही कमी पडू दिले जाणार नाही. मोठा राष्ट्रीय पक्ष आहे. महाशक्ती आहे.
या व्हिडिओमध्ये बंडखोर आमदारांच्या बैठकीत शिंदे आमदारांच्या पुढे बसले आहेत. यावेळी तानाजी सावंत उठतात आणि आमच्याबद्दल जो काही निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या. तुम्ही आमचे गटनेते आहात, असे ते स्पष्ट करताना दिसत आहेत. आता यापुढे काय राजकीय घडामोडी घडतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.