Jayant Patil News: 'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो'; जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

Jayant Patil To Devendra Fadnavis : फसव्या अर्थसंकल्पाची जाहिरात हजार कोटींची
Devendra Fadnavis, Jayant Patil
Devendra Fadnavis, Jayant PatilSarkarnama

Maharashtra Budget Session : विधिमंडळ अधिवेशनातील भाषणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटल यांनी शेतकरी आत्महत्या, रोजगार, महिला, वंचितांच्या प्रश्नांवरून चांगलीच फटकेबाजी केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोलेही लगावले. यासह जाहिरातीवरून सरकारची कानउघडणीही केली आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला सहकार्य करीत नसल्याचा मुद्द्यावरूनही भाजपला सुनावले आहे.

जयंत पाटील यांनी राज्य सरकार हजार कोटी रुपये फक्त जाहिरातीवर खर्च करीत असेल तर राज्याचे भविष्य अवघड असल्याची खंत व्यक्त केली. यावेळी त्यांनी एक वृत्तपत्र काढून त्यावरील जाहिरातच सभागृहात दाखविली.

Devendra Fadnavis, Jayant Patil
PCMC Budget 2023 : पिंपरी-चिंचवड पालिकेचा अर्थसंकल्प : भाजपकडून कौतूक तर राष्ट्रवादीची टीका

पाटील (Jayant Patil) म्हणाले, "अर्थसंकल्पात (Maharashtra Budget) जाहीर केलेल्या योजानांची जाहिरात किती करायची किती नाही, याकडे लक्ष द्यावे. प्रत्येक जाहिरातीवर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच फोटो असतात. इतर मंत्रालयासंबंधित जाहिरात असली तरी संबंधित मंत्र्यांचेही फोटो दिसत नाहीत. महाविकास आघाडीच्या काळात ११५ कोटींचे बजेट जाहिरातीवर होते. आता त्याची प्रोव्हिजन ९९७ कोटी केली आहे. आता जाहिरातीवर हजार कोटी रुपये खर्च होत अवघड होणार आहे."

Devendra Fadnavis, Jayant Patil
Old Pension Strike: 'जुनी पेन्शन' लागू करता येणार नाही, अजितदादांनी सांगितले कारण..

यानंतर त्यांनी आपला मोर्चा फडणवीस यांच्याकडे वळविला. त्यावेळी पाटील यांनी एक गजलच सादर करून फडणवीस यांना टोले लगावले. पाटील म्हणाले, "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांना चेहऱ्यावरचे भाव लपविण्याची कला अवगत नव्हती. आता त्यांनी ही कला चांगली आत्मसात केली आहे. आता त्यांच्यावर काही ओळी सादर करण्याची इच्छा होत आहे." असे म्हणल्यानंतर त्यांनी गजल सादर केली.

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो

क्या गम है जिसको छुपा रहे हो...

आँखो मे नमी हसीं लबोंपर

क्या हाल है, क्या दिखा रहे हो...

Devendra Fadnavis, Jayant Patil
Old Pension: जुन्या निवृत्तिवेतन योजनेसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा पुण्यात मोर्चा

गजल सादर केल्यानंतर पाटील यांनी याचा संदर्भ कसा फडणवीस यांना चपखलपणे बसतो, हेही सांगितले. ते म्हणाले, "शिवेसनेचे आमदार गुवाहटीला गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. पण तसे काही नाही झाले. एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रीपदाची जाबाबदारी दिली. त्यानंतर फडणवीस यांना किंग नाही किंगमेकर होऊ, असे वाटले असेल.

मात्र किंगमेकर तर दिल्लीत बसलेले आहेत. सगळं काही 'दोन नंबर'च्या हातात आहे. त्यामुळे 'क्या हाल है, क्या दिखा रहे हो,' हे जास्त महात्वाचे आहे. त्यामुळे सर्वांच्या लक्षात आले आहे की दिल्लीला गेल्याशिवाय काही होत नाही. राज्यात कुणाच्याही हातात जास्त काही राहिलेले नाही."

यावेळी पाटील यांनी अर्थसंकल्प फसवा असल्याची टीका केली. जयंत पाटील म्हणाले, "तुम्ही मांडलेला अर्थसंकल्प हा शेवटचा असल्याच्या भावनेतून सादर केला आहे. याची जाणीव राज्यातील नागरिकांना आहे. तुम्ही कितीही मोठ्या घोषणा केल्या तरी त्याची सामान्य नागरिकांना भूरळ पडणार नाही. फडणवीस प्रॅक्टीकल अर्थसंकल्प मांडतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी फसवा अर्थसंकल्प मांडला."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com