Sharad Pawar Retirement : तुम्ही आमचे नेते, तुम्हीच आमची कमिटी; भुजबळांची पवारांना निर्णय मागे घेण्याची गळ

Chhagan Bhujbal On Sharad Pawar Retirement : पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
Sharad Pawar, Chhagan Bhujbal
Sharad Pawar, Chhagan BhujbalSarkarnama

Sharad Pawar Retirement News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचे सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन पार पडत आहे. यावेळी शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. तसेच राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही, अशीही घोषणा त्यांनी केली.

Sharad Pawar, Chhagan Bhujbal
Sharad Pawar Big Statement: 'मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार; शरद पवारांची मोठी घोषणा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ यानांही अश्रू अनावर झाले.

Sharad Pawar, Chhagan Bhujbal
Sharad Pawar News : राष्ट्रवादीची कमिटी जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल : राजीनाम्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

यावेळी भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, "तुमचा राजिनामा कुणालाही मंजूर नाही. तुम्ही घेतलेल निर्णय मागे घ्या. आजपर्यंत आम्ही सर्वांनी तुम्ही म्हणाल तसे काम केले आहे. आता तुम्ही वय, अमूक-तमूक असे काही सांगता ते काही आम्हाला मान्य नाही. या वयातही तुम्ही आमच्या दसपट काम करता. तुमची देशाला गरज आहे. देशातील कुणालाही तुमचा राजिनामा मान्य होणार नाही. त्यामुळे आपण आपला राजीनामा मागे घ्यावा. आम्ही तुम्ही म्हणाल तसे वागलेलो आहोत. तुम्ही आमच्या सुख-दुःखात राहिलेला आहात. असे असतानाही आम्ही तुम्हाला कसे काय बाजूला बसू देऊ शकतो. पक्षातील कमीटी वगैरे काही आम्हाला मान्य नाही. तुम्हीच आमची नेते, तुम्हीच आमची कमिटी .. तुम्हीच आमचे सर्वकाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com