मायमराठीच्या जागरासाठी सुप्रिया सुळे यांनी केले आवाहन

संतविचारांचा जागर करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुबई यांच्या वतीने ‘अभंगपट’ या लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

मुंबई : आज मराठी भाषा दिनानिमित्ताने (Marathi Language Day) विविध उपक्रमाचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे. या दिनानिमित्ताने संतविचारांचा जागर करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुबई यांच्या वतीने ‘अभंगपट’ या लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून आज (दि. २७ फेब्रुवारी) घोषणा केली आहे.

Supriya Sule
'हा' बंगाल पॅटर्न किंवा महाराष्ट्र पॅटर्न असेल- आदित्य ठाकरे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जगात सध्या युद्धाची परिस्थिती आहे. आपण सर्वजण आताच कोविड काळातून बाहेर पडलो. या अशा अस्वस्थ वर्तमानामध्ये आपणास संतांच्या विचारांची सर्वाधिक गरज आहे. संतांनी लोकांच्या भाषेत, म्हणजेच आपल्या मायमराठीत समतावादी विचारांचा प्रसार केला.”

संतांच्या या विचारांचा जागर करण्यासाठी ‘अभंगपट’ हा लघुपट महोत्सव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु करण्यात येत असून पहिल्या वर्षी “जे का रंजले, गांजले, त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारीत लघुपट पाठवावे, असे आवाहनही सुळे यांनी यावेळी केले.

Supriya Sule
' दिल्लीश्वराच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकणार नाही '

या महोत्सवासाठी आपले लघुपट सादर करण्याची अंतीम तारीख १८ एप्रिल असून महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे रोजी त्यांचे स्क्रिनिंग व पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. पहिल्या तीन लघुपटांसाठी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली असून काही प्रोत्साहनात्मक बक्षीसेही देण्यात येणार आहेत. यासंबंधीची अधिक माहिती www.ycpmumbai.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दरम्यान, या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन मायमराठी आणि संतविचारांचा जागर करावा, असे आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com