यशोमती ठाकूरांनी मन जिंकलं; मंत्रालयातील स्टाफचा सत्कार करत घेतला निरोप

Yashomati Thakur news| महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर मंत्र्यांनीही कार्यालय सोडण्याची तयारी सुरु केली.
Yashomati Thakur news|
Yashomati Thakur news|Facebook/@YashomatiThakur

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत राज्यात नवे सरकारही स्थापन केले. एकनाथ शिंद राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे उपमुख्यमंत्री झाले.

महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर मंत्र्यांनीही कार्यालय सोडण्याची तयारी सुरु केली. मात्र काँग्रेस नेत्या आणि महिला व बाल विकास खात्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा कार्यालय सोडतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यावेळी कार्यालयातील कर्मचारी भावूक झाल्याचं दिसून आलं.

Yashomati Thakur news|
फडणवीस नाराजच? फेसबुक, ट्विटरवर अजूनही सर्वकाही जैसे थे!

राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री तथा अमरावती पालकमंत्री म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळल्यानंतर आज मुंबईतील मंत्रालयीन कार्यालयातील सहकार्यांचा निरोप घेताना ॲड. यशोमती ठाकूर यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. स्वत: औक्षण करत, शाल पांघरत प्रधान सचिव, खाजगी सचिव, विशेष अधिकारी, पोलिस स्टाफ यांच्यापासून शिपाई, स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक यांचा सत्कार केला.

ॲड ठाकूर म्हणाल्या की, आपण सर्वांनी गेले अडीच वर्ष दिलेली साथ मोलाची आहे. आपण सर्वांनीच सामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले, जनतेच्या भल्याची कामे केली. आता अधिकारी, कर्मचारी असे नाते राहिले नाही तरी आपले ऋणानुबंध आयुष्यभराचे असणार आहेत. मी कायम तुमच्यासोबत असेन, असे ही आश्वस्त केले. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com