Sambhaji Bhide : 'आधी कुंकू लाव..,' वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडेंना महिला आयोगाची नोटीस!

Sambhaji Bhide : आपले वक्तव्य स्त्री सन्मान आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचविणारे
Sambhaji Bhide
Sambhaji BhideSarkarnama

मुंबईः शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे अध्यक्ष संभाजी उर्फ मनोहर भिडे (Sambhaji Bhide) यांनी नुकतंच केलेल्या आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. यावरून आता राज्य महिला आयोग भिडेंविरोधात अधिक कडक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. भिडे यांनी आपली बाजू स्पष्ट करावी, असे आदेशच महिला आयोगाने दिले आहेत. संभाजी भिडे यांनी मुंबईत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

Sambhaji Bhide
...आणि त्यांनी चक्क खासदारांच्या कानशीलात लगावली!

शिंदेंच्या भेटीनंतर साम वृ्त्तवाहिनीच्या एक महिला पत्रकार त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेल्या होत्या. या महिला पत्रकाराला पाहून भिडे म्हणाले की, "आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाहीये. कुंकू लावून या मग तुमच्याशी बोलेन."

Sambhaji Bhide
वाळू तस्करांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; मोठ्या नेत्याच्या कार्यकर्त्याचा हात?

संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधानानंतर महिला संघटनांचा निषेध नोंदवला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना या प्रकरणी नोटीस पाठवलेली आहे. स्त्रीचं दर्जा हा तिच्या कर्तृत्वाने सिद्ध होतो.

आपले वक्तव्य स्त्री सन्मान आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचविणारे आहे, त्यामुळेआयोगाने या प्रकरणात दखल घेतली आहे. कपाळावर टिकली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार देण्यामागील भूमिकेचा खुलासा करावा, अशा आशयाची नोटीस भिडेंना पाठवण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in