राहुल शेवाळेंच्या अडचणीत वाढ; संबंधित महिलेने दिली आत्महत्येची धमकी

Shivsena | Rahul Shewale | गुन्हा दाखल करण्याचे आदेश देवून आपल्याला न्याय द्यावा
Rahul Shewale latest News
Rahul Shewale latest News Sarkarnama

मुंबई : शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून खासदार राहुल शेवाळे यांनी फसवणुक केल्याचा आरोप करत एका महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिले आहे. पोलिस आपली तक्रार घेत नसल्यामुळे आपण गुन्हा दाखल करण्याचे आदेश देवून आपल्याला न्याय द्यावा अशी विनंती या पत्रात केली आहे. तसेच गुन्हा दाखल न केल्यास आत्महत्येचा इशाराही संबंधित महिलेने दिला आहे. (Shivsena | Eknath shinde latest News)

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका महिलेने खासदार राहुल शेवाळे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत मुंबईच्या साकीनाका पोलिस स्थानकात तक्रारीत केली होती. खासदार शेवाळे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत, ही तक्रार संपूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले होते. माझी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्पर तक्रार करण्यात आली आहे, असेही शेवाळे यांनी म्हटले होते.

Rahul Shewale latest News
राजन पाटलांचं अखेर ठरलं : दोन तारखेला भाजपत प्रवेश, बाळराजेंना विधान परिषदेचा शब्द!

त्यानंतर काही दिवसांपूर्वी राहुल शेवाळे यांनी आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात येत असल्याची तक्रार साकीनाका पोलिसांकडे दिली होती. शेवाळेंनी त्या महिलेच्या विरोधात खंडणी, फसवणूक, आणि बदनामी केल्याची तक्रार केली आहे. अंधेरी सत्र न्यायालयानेही साकीनाका पोलिसांना तक्रार घेण्याचा आदेश दिला होता.

Rahul Shewale latest News
मोठी बातमी : शिंदेंचा ठाकरे कुटुंबीयांना दणका; वरुण सरदेसाईंची युवासेनेतून उचलबांगडी

'त्या' महिलेने आपल्या व्यवसायासाठी आर्थिक मदत मागण्यासाठी संपर्क साधला. तसेच काही व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत शेवाळे यांनी त्यांच्या पत्नीशी घटस्फोट घेत लग्न करण्यासाठी दबाव आणला, तिनं बदनामी करुन त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरवात केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. शेवाळे यांच्याकडून संबंधित महिलेने आत्तापर्यंत ५६ लाख रुपये, आयफोनसह बारा भेटवस्तू घेतल्या आहेत. सोशल मीडियावर तिने शेवाळेंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, असल्याचे तक्रारीत नमूद केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com